दहिसर, बोरिवलीमध्ये कोविड केअर केंद्र

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून प्रशासनाने त्यासाठी उपाययोजना सुरू केली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनतर्फे (एमएमआरसी) दहिसर चेक नाका तसंच बोरिवली कांदरपाडा येथे कोविड केअर केंद्र उभारण्यात येत आहे.

पश्चिम उपनगरात कोरोना रुग्णांची संख्या मोठी आहे. दररोज नवीन रुग्ण आढळत आहेत. त्यामुळे या ठिकाणी कोविड कक्ष उभारण्याची मागणी शिवसेना उपनेते म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांनी केली होती. दहिसर जकात नाका येथे ८०० ऑक्सिजनयुक्त बेडची व्यवस्था असणार आहे. तर बोरिवली आरटीओ कार्यालयाजवळील कांदरपाडा येथे डायलिसिस सुविधा असणारी २२० बेडची अतिदक्षता विभागांचे एक अलगीकरण केंद्र बांधण्यात येणार आहे.

याबाबत एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी सुरू झालेले हे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले असून येत्या दोन आठवड्यात ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. मंगळवारी शिवसेना उपनेते म्हाडा सभापती विनोद घोसाळकर यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत या कामाची पाहणी केली. यावेळी मुंबई बँकचे संचालक अभिषेक घोसाळकर, शाखाप्रमुख प्रकाश पुजारी, राजू इंदुलकर उपस्थित होते. 


हेही वाचा -

विमान सेवेतून 'इतक्या' प्रवाशांचं मुंबईत आगमन

कोरोनामुळे वडाळ्यातील जीएसबी मंडळाचा यंदाचा गणेशोत्सव रद्द!


पुढील बातमी
इतर बातम्या