Advertisement

कोरोनामुळे वडाळ्यातील जीएसबी मंडळाचा यंदाचा गणेशोत्सव रद्द!

कोरोनाच्या परिस्थितीत या गर्दीवर नियंत्रण कसे मिळवावे आणि सोशल डिस्टंनसिंग कसे पाळावे याचा पेच सार्वजनिक मंडळांमध्ये निर्माण झाला आहे.

कोरोनामुळे वडाळ्यातील जीएसबी मंडळाचा यंदाचा गणेशोत्सव रद्द!
SHARES

दरवर्षी महाराष्ट्रात गणेशोत्सव उत्साहात साजरा केला जातो. पण यावर्षी महाराष्ट्रावर कोरोनाव्हायरसचं सावट आहे. अशा परिस्थितीत गणेशोत्सव कसा साजरा करायचा याची सर्वांनाच चिंता आहे. विशेष करून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपुढे मोठाच प्रश्न निर्माण झाला आहे.

गणेशोत्सवात गणपतीच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येनं भक्त दर्शनासाठी येतात. कोरोनाच्या परिस्थितीत या गर्दीवर नियंत्रण कसे मिळवावे आणि सोशल डिस्टंनसिंग कसे पाळावे याचा पेच सार्वजनिक मंडळांमध्ये निर्माण झाला आहे. त्यामुळेच मुंबईच्या एका गणेशोत्सव मंडळानं एक मोठा आणि महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

महाराष्ट्रावरील कोरोनाचे सावट पाहता वडाळा राम मंदिर जीएसबी सार्वजनिक मंडळानं यावर्षी भाद्रपदातील गणेश चतुर्थीला गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याऐवजी गणेशोत्सव माघ महिन्यातील २०२१ मधील गणेश चतुर्थीला साजरा करण्यात येणार आहे.

जीएसएबी वडाळा इथं ११ दिवसांचा गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. या दरम्यान लाखो भाविक दर्शनासाठी येतात. त्यामुळे गर्दी असते. पण कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हीच गर्दी टाळणं गरजेचं आहे. कारण गर्दी सोबतच कोरोनाव्हायरसचा संसर्ग वेगानं पसरू शकतो.

सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जीएसबी मंडळानं यावर्षीचा गणेशोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला. कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सोशल डिस्टंनसिंग पाळणं गरजेचं आहे. पण गणेशोत्सवात होणारी गर्दी पाहता त्यावर मंडळाच्या स्वयंसेवकांना कंट्रोल ठेवणं शक्य होणार नाही. त्यामुळे आम्ही हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला.

सुभाष पै, माध्यम समन्वयक, जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव समिती

यासंदर्भात मंडळानं पदाधिकाऱ्यांसोबत एक बैठक घेतली. सर्व परिस्थितीवर बैठकीत चर्चा करण्यात आली. सर्व सदस्यांनी एकमतानं यावर्षीचा गणेशोत्सव रद्द करून २०२१ मध्ये साजरा करण्याचा निर्णय घेतला.

कोरोनाचं सावट असल्यानं यावर्षी गणेशोत्सव साजरा करण्याबाबत राज्य सरकारकडून अनेक बंधनं येण्याची शक्यता आहे. मास्क लावणं, सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग राखणं या नियमांचं पालन बंधनकारक असू शकतं. त्यामुळे यावर्षी अनेक मंडळांसाठी या सर्व नियमांचं पालन करत गणेशोत्सव साजरा करणं डोकेदुखी ठरू शकतं. आता इतर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ काय निर्णय घेतात किंवा ते सर्व नियमांचं पालन कशाप्रकारे करणार आहेत ते येणाऱ्या काही दिवसात कळेलच.          



हेही वाचा

मुंबईच्या राजाचा मोठा निर्णय, यंदा 'असा' साजरा होणार गणेशोत्सव!

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा