Advertisement

मुंबईच्या राजाचा मोठा निर्णय, यंदा 'असा' साजरा होणार गणेशोत्सव!

गणेशगल्लीच्या लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या निर्णयाचं सर्वत्र कौतुक होत आहे.

मुंबईच्या राजाचा मोठा निर्णय, यंदा 'असा' साजरा होणार गणेशोत्सव!
SHARES

कोरोनाव्हायरसच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा १० हजारच्या वर गेला आहे. सध्या देशभरात Lockdown ३.० लागू करण्यात आला आहे. त्यामुळे अनेक उद्योग-धंदे बंद आहेत. व्यवसाय ठप्प झाले आहेत. अनेक कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत गणेशगल्लीच्या लालबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

गणेशोत्सवास आता काही महिने उरले आहेत. पण यावर्षी गणेशोत्सवावर कोरोनाचं सावट आहे. कोरोनाचं सावट पाहता अनेक मंडळांनी काही कौतुकास्पद निर्णय घेतले आहेत. त्यापैकीच एक मंडळ आहे गणेश गल्लीतील लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळ. 

कोरोनाव्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक गणित बिघडले आहे. अशा परिस्थितीत विभागीय वर्गणीदारांवर गणेशोत्सवाचा आर्थिक बोजा न टाकण्याचा निर्णय मंडळानं घेतला आहे. यंदाच्या गणेशोत्सवात वर्गणीदारांकडून वर्गणी न घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय मुंबईच्या राजातर्फे घेण्यात आला आहे. फेसबुकवर पोस्ट करत त्यांनी याची माहिती दिली.


लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळाच्या या निर्णायचं सर्वत्र कौतुक होत आहे. काही दिवसांपूर्वी लालबाग सार्वजनिक मंडळानं मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आर्थिक मदत केली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत मुंबईच्या राजाच्या वतीनं ५ लाख निधीची मदत करण्यात आली.

काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदान शिबिरांची आवश्यकता असल्याची म्हटलं होतं. राज्यात रक्ताचा तुटवडा होण्याची शक्यता असल्यानं रक्तदानाचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलं होतं. त्याला प्रतिसाद देत लालबाग सार्वजनिक उत्सव मंडळानं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छ वातावरणात, गर्दी टाळत रक्तदान शिबिर आयोजित केलं होतं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षित अंतर आणि स्वच्छता बाळगत रक्तदान केलं गेलं.



हेही वाचा

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलांवामध्ये जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा

यंदाच्या पावसाळ्यात 20 दिवस हाय टाईड, जास्त पावसाने मुंबई तुंबण्याची भीती

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा