Advertisement

यंदाच्या पावसाळ्यात 20 दिवस हाय टाईड, जास्त पावसाने मुंबई तुंबण्याची भीती

यंदाच्या पावसाळ्यात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात 20 दिवस समुद्राला उधाण येणार आहे. पंचागकर्त, खगोल अभ्यासक दा. कृ.सोमण यांनी ही माहिती दिली आहे.

यंदाच्या पावसाळ्यात 20 दिवस हाय टाईड, जास्त पावसाने मुंबई तुंबण्याची भीती
SHARES

यंदाच्या पावसाळ्यात जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात 20 दिवस समुद्राला उधाण येणार आहे. पंचागकर्त, खगोल अभ्यासक दा. कृ.सोमण यांनी ही माहिती दिली आहे. या उधाणाच्या कालावधीत अतिवृष्टी झाल्यास मुंबई, ठाणे परिसर जलमय होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

समुद्राला जून-जुलै-ऑगस्ट महिन्यात साडेचार मीटरपेक्षा जास्त भरती येणार असलेले दिवस, वेळ व समुद्राच्या पाण्याची उंची याची माहिती खगोल अभ्यासक दा.कृ. सोमण यांनी दिली आहे. यंदा जून महिन्यात 4 ते 9 जून तसेच 23 व 24 जून आणि जुलै महिन्यात 4 ते 7 जुलै आणि 21 ते 24 जुलै असे प्रत्येकी आठ तर, ऑगस्ट महिन्यात 19 ते 22 ऑगस्ट हे चार दिवस असे पावसाळ्यात एकूण 20 दिवस समुद्राला उधाण भरती येणार आहे. यादिवशी भरतीच्या पाण्याची उंची 4.5 मीटरपेक्षा अधिक असणार आहे. उधाणाची उंची ही लाटेची नसून भरतीच्या पाण्याची असल्याने किनारपट्टीच्या भागातील नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे असल्याचे सोमण यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे पावसाळ्यात समुद्राच्या उधाण भरतीच्यावेळी जर जोराचा पाऊस झाला तर मुंबई, ठाणे शहरामध्ये पाणी तुंबण्याची जास्त शक्यता आहे.

उधाणाचे दिवस, वेळ, पाण्याची उंची

गुरुवार 4 जून (सकाळी 10:57) - पाण्याची उंची 4.56 मीटर

शुक्रवार 5 जून (सकाळी 11:45) - पाण्याची उंची 4.75 मीटर

शनिवार 6 जून (दुपारी 12:33) - पाण्याची उंची 4.82 मीटर

रविवार 7 जून (दुपारी 1:19) - पाण्याची उंची 4.78 मीटर

सोमवार 8 जून (दुपारी 2:04 ) - पाण्याची उंची 4.67 मीटर

मंगळवार 9 जून (दुपारी 2:48) - पाण्याची उंची 4.50 मीटर

मंगळवार 23 जून (दुपारी 1:43) - पाण्याची उंची 4.52 मीटर

बुधवार 24 जून (दुपारी 2:25) - पाण्याची उंची 4.51 मीटर

शनिवार 4 जुलै (सकाळी 11:38) - पाण्याची उंची 4.57मीटर

रविवार 5 जुलै (दुपारी 12:23) - पाण्याची उंची 4.63मीटर.

सोमवार 6 जुलै (दुपारी 1:06) - पाण्याची उंची 4.62 मीटर

मंगळवार 7 जुलै (दुपारी 1:46) - पाण्याची उंची 4.54 मीटर

मंगळवार 21 जुलै (दुपारी 12:43) - पाण्याची उंची 4.54 मीटर

बुधवार 22 जुलै (दुपारी 1:22) - पाण्याची उंची 4.63 मीटर

गुरुवार 23 जुलै (दुपारी 2:03) - पाण्याची उंची 4.66 मीटर

शुक्रवार 24 जुलै (दुपारी 2:45) - पाण्याची उंची 4.61 मीटर

बुधवार 19 ऑगस्ट (दुपारी 12:17) - पाण्याची उंची 4.61 मीटर

गुरुवार 20 ऑगस्ट (दुपारी 12:55) -पाण्याची उंची 4.73 मीटर

शुक्रवार 21 ऑगस्ट (दुपारी 1:33) -पाण्याची उंची 4.75 मीटर

शनिवार 22 ऑगस्ट (दुपारी 2:14)- पाण्याची उंची 4.67 मीटर



हेही वाचा  -

EXCLUSIVE : बोंबील ऑन डिमांड! ताजा म्हावरा तुमच्या दारात

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलांवामध्ये जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा




Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा