Advertisement

4 दिवसात वाढले 10 हजार कोरोना रुग्ण

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील 4 दिवसात तर कोरोना रुग्णांची संख्या 10 हजारांनी वाढली आहे.

4 दिवसात वाढले 10 हजार कोरोना रुग्ण
SHARES

देशभरात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मागील 4 दिवसात तर कोरोना रुग्णांची संख्या 10 हजारांनी वाढली आहे. देशातील कोरोना रुग्णांचा आकडा 40 हजार वरून थेट 50 हजारांवर गेला आहे. इतकी झाली आहे. यामधील सर्वाधिक रुग्ण मुंबईतील आहेत.

रुग्ण संख्या                  दिवस

3 -100                         14 दिवस


100 -1000                    14


1000 -10,000               16


10,000 -50,000           23


40,000 - 50,000          4


देशातील कोरोना रुग्णांची संख्या शुक्रवारी (8 मे) ५६ हजारांवर पोहोचली आहे. 3 ते 6 मे या चार दिवसांत रुग्णांच्या संख्येने उसळी मारली आहे.. या चार दिवसांमध्ये तब्बल दहा हजार कोरोना रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे देशातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या ४०,००० वरून थेट ५०,००० इतकी झाली. यात सात राज्यांमध्ये ३००० पेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत. या राज्यांमध्ये महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, तामिळनाडू, राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश यांचा समावेश आहे.

 देशात 12 लाख 76 हजार 781 जणांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. यात 50 हजार पॉझिटिव्ह निघाले आहेत. देशातील पॉझिटिव्ह रूग्णांचं प्रमाण३ टक्के आहे.  मुंबईत 73 हजार चाचण्या करण्यात आल्या असून 11 हजार  जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मुंबईतील करोना पॉझिटिव्ह असणाऱ्या रुग्णांचं प्रमाण १५ टक्के आहे.



हेही वाचा  -

EXCLUSIVE : बोंबील ऑन डिमांड! ताजा म्हावरा तुमच्या दारात

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलांवामध्ये जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा