मध्य रेल्वेकडून मुंबई ते गोवा वन-वे स्पेशल ट्रेनची घोषणा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मध्य रेल्वेने शनिवारी प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी मुंबई ते मडगाव विशेष शुल्क आकारून वन वे विशेष ट्रेन चालवण्याची घोषणा केली आहे.

गाडी नंबर

01427 वन वे विशेष गाडी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून शनिवार 3.12.2022 रोजी 00.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी मडगावला 12.15 वाजता पोहोचेल.

कुठे थांबणार?

वन वे विशेष गाडी दादर, ठाणे, पनवेल, रोहा, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सावंतवाडी रोड आणि करमाळी स्थानकावर थांबेल.

रचना कशी?

ट्रेनमध्ये 15 स्लीपर क्लास कोच आणि 2 जनरल सेकंड क्लास कम गार्ड ब्रेक व्हॅन असतील.

आरक्षण माहिती खालीलप्रमाणे

01427 वन-वे स्पेशल ट्रेनसाठी विशेष शुल्कावर बुकिंग 02.12.2022 रोजी सर्व PRS स्थानांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर सुरू होईल. या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा.


हेही वाचा

ज्येष्ठ नागरिकांसाठी रेल्वेने स्वतंत्र डबा देण्याची मागणी, हायकोर्टात याचिका

गर्दीमुळे महिलेने केला एसी लोकलच्या मोटरमन केबिनमधून प्रवास, पहा व्हायरल व्हिडिओ

पुढील बातमी
इतर बातम्या