Advertisement

गर्दीमुळे महिलेने केला एसी लोकलच्या मोटरमन केबिनमधून प्रवास, पहा व्हायरल व्हिडिओ

बोरिवली स्थानकावर सकाळी 8.30 च्या सुमारास ही महिला चर्चगेटला जाणाऱ्या एसी लोकलमध्ये चढली. पण पुढे जे झाले ते पाहून तुम्हाला धक्काच बसेल. पहा नेमकं असे काय झालं की ती महिला मोटरमन केबिनमध्ये चढली.

गर्दीमुळे महिलेने केला एसी लोकलच्या मोटरमन केबिनमधून प्रवास, पहा व्हायरल व्हिडिओ
SHARES

एसी लोकलमध्ये प्रवास करणाऱ्यांची संख्या काही कमी नाही. वेर्स्टन लाईनवर एसी लोकलला चांगलीच डिमांड आहे. दिवसेंदिवस एसी लोकलमधील गर्दी देखील वाढत आहे. नुकताच एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये महिला चक्क एसी लोकलच्या मोटरमन केबिनमध्ये चढून प्रवास करायला लागली.  

बोरिवली स्थानकावर सकाळी 8.30 च्या सुमारास ही महिला चर्चगेटला जाणाऱ्या एसी लोकलमध्ये चढली. 

व्हिडिओमध्ये महिला एसी लोकलमध्ये चढली. पण खूप गर्दी असल्याने ती महिला फूटबोर्डवर लटकून उभी होती. यामुळे एसी लोकलचे दरवाजे बंद होत नव्हते. एसी लोकलचे दरवाजे बंद होत नाहीत तोपर्यंत ट्रेन पुढे जाऊ शकत नाही.    

रेल्वे प्रोटेक्शन फोर्स (RPF) च्या कर्मचार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि महिलेला खाली उतरण्याची विनंती केली जेणेकरून दरवाजे बंद होतील आणि ट्रेन निघू शकेल. तथापि, पण महिलेने खाली उतरण्यास नकार दिला. तिला समजवण्याचा प्रयत्न केला पण ती खाली उतरण्यास तयार नव्हती. अखेर ट्रेन गार्डने तिला मोटरमन केबिनमध्ये बसून प्रवास करण्यास सांगितलं. त्यानंतर ती महिला उतरली आणि मोटरमन केबिनच्या डब्यात बसून पुढचा प्रवास केला.  


हेही वाचा

Mumbai Traffic Update: मुंबईत उद्या वाहतूकीत बदल, वाचा कुठले रस्ते बंद


चालकाच्या डब्यात बसण्यास परवानगी नाही. पण चालकाकडे कुठलाच पर्याय नव्हता. कारण जोपर्यंत ती उतरत नाही तोपर्यंत एसी लोकलचे दरवाजे बंद होणार नव्हते.

"तिला ट्रेन मॅनेजरच्या केबिनमध्ये प्रवास करण्यास परवानगी नसली तरी, गर्दीच्या वेळेस त्या वेळी ट्रेनची वक्तशीरपणा पाळणे फार महत्वाचे होते," असे एका वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्याने सांगितले, हा प्रकार टाळण्यासाठी महिला कर्मचारी तैनात केले जातील.

मात्र, रेल्वेच्या या उत्तराला नेटकऱ्यांनी संमिश्र प्रतिसाद दिला.

“स्त्रीला दोष का दिला जातोय? त्यासाठी तिने पैसे दिले होते. त्यानंतर कदाचित एसी लोकल नसेल. ट्रेनमध्ये जागा नसेल तर दोष कोणाचा? रिंकेश शाह यांनी ट्विट केले आहे.

दुसर्‍याने पोस्ट केले, “रेल्वे नियमावलीनुसार हे उल्लंघन आहे, परंतु बरेच रेल्वे कर्मचारी गार्डच्या डब्यातून प्रवास करताना दिसतात.”

त्याचप्रमाणे एका प्रवाशाने ट्विट केले की, “जर इतर डब्यातील काही महिलांनीही असा प्रकार केला तर ड्रायव्हर काय करतील.”

दुसरा म्हणाला, “हे जर एका पुरुषाने केले असते तर त्याला मारहाण करण्यात आली असती.”



हेही वाचा

महापरिनिर्वाण दिन: ६ डिसेंबरला 'या' मार्गावर १२ विशेष लोकल सुविधा

मुंबई: बेस्टने प्रवास करणे झाले आणखी स्वस्त

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा