Advertisement

Mumbai Traffic Update: मुंबईत 2 डिसेंबरला वाहतूक पोलिसांकडून निर्बंध जाहीर, वाचा कुठले रस्ते बंद

मुंबई वाहतूक पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनात कुठले रस्ते बंद आणि कुठल्या भागातील वाहतुकीवर परिणाम होईल यासंदर्भातील माहिती दिली आहे.

Mumbai Traffic Update: मुंबईत 2 डिसेंबरला वाहतूक पोलिसांकडून निर्बंध जाहीर, वाचा कुठले रस्ते बंद
(File Image)
SHARES

मुंबई वाहतूक पोलिसांनी प्रसिद्ध केलेल्या अधिकृत निवेदनानुसार, व्हीव्हीआयपीच्या पूर्व-नियोजित भेटीमुळे उद्या, 2 डिसेंबरला उपनगर आणि दक्षिण मुंबईतील अनेक भागात वाहतूक संथ गतीने होईल.

भारतीय नौदल गेटवे ऑफ इंडिया, मुंबई येथे 1 डिसेंबर 2022 ते 4 डिसेंबर 2022 या कालावधीत बीटिंग रिट्रीट आणि टॅटू सेरेमनी 22 आयोजित करणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे, रीगल सर्कल ते रेडिओ क्लब हा रस्ता इव्हेंटच्या 17:00-19:00 दरम्यान आणि कार्यक्रमाच्या आधी आणि नंतर कधीतरी वाहनांच्या रहदारीसाठी बंद असेल. 

शिवाय, सांताक्रूझ, वाकोला, वांद्रे-वरळी सी लिंक, हाजी अली, बँडस्टँड, एअर इंडिया, रिगल सर्कल दरम्यान 11.00 ते 12.30 आणि 14.30 ते 17.00 वाजेपर्यंत वाहतूक स्लो राहील. त्यानुसार नागरिकांनी प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.हेही वाचा

मुंबईत 2 जानेवारीपर्यंत कर्फ्यू, कुठल्या गोष्टींवर निर्बंध जाणून घ्या

सायन उड्डाणपुलावरील वाहतूकीत ३० जानेवारीपर्यंत बदल, जाणून घ्या वेळ

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा