दिवाळीनिमित्त मध्य रेल्वे विशेष गाड्या चालवणार

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

येत्या दिवाळी सणासुदीनिमित्त (Diwali 2025) मध्य रेल्वे (central railway) प्रवाशांच्या सोयीसाठी 30 अतिरिक्त विशेष गाड्या (festival special trains) चालवणार आहे.

सविस्तर माहिती खाली दिल्याप्रमाणे:

1) एलटीटी-मडगाव-एलटीटी साप्ताहिक विशेष (6 फेऱ्या)

01003 साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर सोमवारी 06.10.2025, 13.10.2025 आणि 20.10.2025 रोजी सकाळी 08.20 वाजता निघेल आणि त्याच दिवशी रात्री 22.40 वाजता मडगाव येथे पोहोचेल. (3 फेऱ्या)

01004 साप्ताहिक विशेष लोकमान्य टिळक टर्मिनस येथून दर रविवारी 05.10.2025, 12.10.2025 आणि 19.10.2025 रोजी दुपारी 4.30 वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 06.20 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथे पोहोचेल. (3 फेऱ्या)

थांबे: ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिविम आणि करमाळी.

डब्यांची रचना: एक एसी-1 टायर, तीन एसी-3 टायर, दोन एसी-3 टायर इकॉनॉमी, 8 स्लीपर क्लास, 4 जनरल सेकंड क्लास, 1 सेकंड सीटिंग कम गार्ड ब्रेक व्हॅन आणि 1 जनरेटर व्हॅन.

आरक्षण: विशेष ट्रेन 01003 साठी बुकिंग आता सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in वेबसाइटवर खुले आहे.

2) पनवेल-चिपळूण-पनवेल अनारक्षित स्पेशल (24 फेऱ्या)

01159 अनारक्षित स्पेशल 03.10.2025 ते 26.10.2025 पर्यंत दर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी 16.40 वाजता पनवेलहून निघेल आणि त्याच दिवशी रात्री 21.55 वाजता चिपळूणला पोहोचेल.

01160 अनारक्षित स्पेशल 03.10.2025 ते 26.10.2025 पर्यंत दर शुक्रवार, शनिवार आणि रविवारी सकाळी 11.05 वाजता चिपळूणहून निघेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 4.10 वाजता पनवेलला पोहोचेल.

थांबे: सोमटणे, आपटा, जिते, पेण, कासू, नागोठणे, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गोरेगाव रोड, वीर, सापे वामणे, करंजडी, विन्हेरे, दिवाणखवटी, कळंबानी बुद्रुक, खेड आणि अंजनी

रचना: 8 मेमू कोच.

वरील गाड्या अनआरक्षित म्हणून धावतील आणि सुपरफास्ट मेल/एक्सप्रेस गाड्यांसाठी लागू असलेल्या सामान्य शुल्कासह प्रवाशांना यूटीएस प्रणालीद्वारे तिकिटे बुक करता येतील.

विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES अॅप डाउनलोड करा


हेही वाचा

महाराष्ट्रातही कोल्ड्रिफ सिरपच्या विक्रीवर बंदी

बोरिवली-ठाणे भुयारी मार्गासाठी ग्रंथालयावर हातोडा?

पुढील बातमी
इतर बातम्या