गिरगावात ठाकूरद्वारजवळ क्रेन कलंडली

  • मुंबई लाइव्ह टीम & तुषार वैती
  • सिविक

मुंबईत ठिकठिकाणी मेट्रोची कामे सुरू असताना अनेक अपघाताच्या घटना घडत अाहेत. गोरेगावमध्ये सकाळी क्रेन कोसळण्याची घटना ताजी असतानाच, गिरगावमध्ये ठाकूरद्वार सिग्नलजवळ क्रेन कलंडल्याची घटना रविवारी संध्याकाळी साडेपाचच्या सुमारास घडली अाहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी घडलेली नाही.

४ मजली क्रेन कोसळली

जमिनीच्या खाली खड्डे पाडण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी अवाढव्य उंच क्रेन कार्यरत अाहेत. त्यापैकी गिरगाव ठाकूरद्वार सिग्नलजवळ असलेली चार मजली क्रेन अाज रस्त्यावर कलंडली. ही क्रेन रस्त्यांवर समांतर अशी कोसळल्यामुळे मोठी दुर्घटना टळली. जर ही ट्रेन रस्त्यांवर असलेल्या वाहनांवर किंवा समोरील चाळींवर कलंडली असती तर मोठा वादंग घडला असता.

गोरेगावमध्ये क्रेन कोसळली

गोरेगावमधील एसव्ही रोडवर शनिवारी रात्री पूलाच्या बांधकामादरम्यान गर्डर अाणि क्रेन कोसळल्याची घटना घडली. त्यामुळे एसव्ही रोडवर मोठी वाहतूककोंडी झाली होती. सुदैवाने यात कोणीही जखमी झालं नाही.


हेही वाचा -

कुरियर बॉय बनून चौघांनी वृद्ध महिलेला लुटलं


पुढील बातमी
इतर बातम्या