कुरियर बॉय बनून चौघांनी वृद्ध महिलेला लुटलं

ताडदेव परिसरात अशाच भूलथापांना बळी पडलेल्या वृद्ध महिलच्या घरातून साडेतीन लाखांच्या रोख रकमेसह लाखोंचे मौल्यवान दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

कुरियर बॉय बनून चौघांनी वृद्ध महिलेला लुटलं
SHARES

मुंबईकरांनो कुुुरिअर देण्यासाठी कुणी तुमच्या दारात आलं, तर त्यांना लगेच घरात घेऊ नका. तो खरंच तुमचं कुरिअर देण्यासाठी आला आहे ना? याची खात्री करून घ्या, नाहीतर तुमची लूट होऊ शकते! कारण ताडदेव परिसरात अशाच भूलथापांना बळी पडलेल्या वृद्ध महिलच्या घरातून साडेतीन लाखांच्या रोख रकमेसह लाखोंचे मौल्यवान दागिने चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. कालांतराने पोलिस तपासात या चोरीमागे इमारतीत शेजारच्या घरात कामासाठी येणाऱ्या नोकराचा हात असल्याचं उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी नोकरासह चौघांना अटक केली आहे.


कशी केली चोरी?

ताडदेव येथील 'कॅटी टेरेस'मध्ये शरद श्राफ हे त्यांची पत्नी रिटा श्राफ सोबत राहतात. गिरगाव परिसरात शरद यांचा दवाखाना आहे. ६ मार्चला शरद हे दवाखान्यात गेले असता एक कुरियर बॉय त्यांच्या घरी आला. त्याने त्यांना पतीचे पार्सल आल्याचं सांगितलं. त्यांनी दूरध्वनी करून विचारणा केली असता, असं कोणतंही पार्सल येणार नसल्याचं त्यांनी सांगितलं. त्यानंतर मात्र त्या कुरियरबॉयने रिटा यांच्याकडे पाणी मागितलं. त्यांनी सेफ्टी दरवाजा उघडताच आरोपी जबरदस्तीने घरात शिरला. त्यावेळी रिटा यांनी आरडाओरडा करण्याचा प्रयत्न करताच आरोपींनी त्यांचं तोंड दाबलं. त्यानंतर त्यांचे हात-पाय बांधून चाकूचा धाक दाखवत आरोपींनी साडेतीन लाखांच्या रकमेसह सुमारे चार लाखांचा मुद्देमाल पळवला. यानंतर रिटा यांनी ताडदेव पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा नोंदवला.


शेजारच्या घरातील नोकर निघाले चोर

तपासादरम्यान पोलिसांनी परिसरातीस सीसीटिव्हीच्या मदतीने आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली. त्यावेळी वृद्ध महिलेच्या शेजारी घर कामाला असलेला नोकर गंगाधर याचा या चोरीत हात असल्याचं स्पष्ट झालं. त्यानुसार पोलिसांनी चोरीतील इतर आरोपी सुरेश भरत चंद (२३), अर्जुन गंगाधर रावळ (२४), गंगाधर ऊर्फ अजय शेट्टी (२२) आणि जितेश कुमार नायक (२७) यांना अटक केली. हे चौघेही मूळचे ओडिशातील रहिवासी आहेत. सर्व जण मुंबईत घरकाम आणि हॉटेलमध्ये काम करतात. त्या चौघा आरोपींनी वाशी येथे जाऊन चोरीच्या मुद्देमालाचे वाटप केले. कुरियर बॉय बनून घरात शिरणाऱ्या मुख्य आरोपीचा पोलिस शोध घेत आहेत. चोरीतील काही मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. काही आरोपींनी त्यांच्या वाट्याची रक्कम गावी पाठवल्याचे निष्पन्न झाले आहे.


हेही वाचा - 

'फटका गँग'ला जीआरपीचा 'दणका'

६५ वर्षाच्या वृद्धेनेच केली आपल्या नवऱ्याची हत्या

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा