मुंबईच्या डबेवाल्यांना हवी लोकल प्रवासाची मुभा

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

वाढत्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळं सार्वजनिक वाहतूक सेवा सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद ठेवण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी होऊ नये व नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीनं राज्य सरकारनं हा निर्णय घेतला होता. परंतु, आता हळूहळू राज्य सरकार लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणत आहे. त्यानुसार, अनेक व्यवहार पुन्हा सुरू झाले असून, मुंबईतील वाहतूक सेवाही पुन्हा पूर्ण प्रवासी क्षमतेनं सुरू करण्यात आली. केवळ मुंबईची लाइफलाइन लोकल सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंद ठेवण्यात आली. त्यामुळं अनेकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.

मुंबई लोकल ही केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठीच आणि सर्वसामान्यांकरीता लोकलचा प्रवास उपलब्ध नसल्यामुळं सामन्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. कारण इंधन दरवाढ आणि त्यात वाढलेली महागाई यामुळं अनेकांचं आर्थिक गणित चुकत आहे. शिवाय, महिन्याच्या खर्चात ही वाढ होतेय. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांना ही लोकलचा प्रवास लवकर सुरू करावा अशी मागणी धरली आहे.

दरम्यान, लोकल प्रवासात केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच प्रवेश देण्यात आला आहे. मात्र मुंबईच्या डबेवाल्यांना लोकल प्रवासास अद्याप बंदी आहे. त्यामुळं जेवणाचा डबा रस्तेमार्ग पोहचवण शक्य नाही. निश्चित वेळेत डबा पोहोचण्यासाठी बराच वेळ जातो. यामुळं मुंबईच्या डबेवाल्यांना लोकल प्रवास उपलब्ध करून घ्यावा अशी मागणी मुंबई डबेवाला असोसिएशनचे अध्यक्ष सुभाष तळेकर यांनी राज्य सरकारकडं केली आहे.

राज्यातील अनेक भागांतील निर्बंध शिथिल करत पुन्हा अनलॉकची घोषणा झाली. यामुळे व्यापाऱ्यांसह सामान्य नागरिकांना दिलासा मिळत आहे. मात्र राज्य सरकारने सरसकट लॉकडाऊन न उठवता ५ टप्प्यामध्ये अनलॉक करण्यासाठी नियमावली आखली आहे. योग्य खबरदरी घेत निर्बंध लागू करत सरकारने काही जिल्ह्यात निर्बंध शिथिल केले आहेत. अशातच सामान्य नागरिकांसाठी अद्याप लोकलसेवा सुरू करण्यात आली नाहीये. मुंबईसारख्या गर्दीच्या शहरात लोकल सेवेविना लोकांची प्रवास करण्याची परवड होत असते.


हेही वाचा -

१८ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना केंद्राकडून मोफत लस

देशभरात लसीकरणामध्ये महाराष्ट्राचा पहिला क्रमांक


पुढील बातमी
इतर बातम्या