Advertisement

१८ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना केंद्राकडून मोफत लस

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सोमवारी देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी महत्त्वपूर्ण घोषणा केल्या.

१८ वर्षांहून अधिक वयाच्या लोकांना केंद्राकडून मोफत लस
SHARES

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) सोमवारी देशाला संबोधित केलं. यावेळी त्यांनी १८ (18+) वर्षांच्या जास्त वयाच्या लोकांना केंद्राकडून मोफत लस (Vaccine) देण्याची महत्त्वपूर्ण घोषणा केली.

ते म्हणाले की, २१ जूनपासून भारत सरकार Central Government) देशातील प्रत्येक राज्यात १८ वर्षांवरील लोकांना राज्यांना (State Government) मोफत लस (Free Vaccine) उपलब्ध करुन दिली जाईल. व्हॅक्सीन निर्मात्यांकडून एकूण उत्पादनाचा ७५% भाग स्वतः खरेदी करुन राज्य सरकारला मोफत देईल. कोणत्याही राज्य सरकारला लसींसाठी काहीच खर्च करावा लागणार नाही.

मोफत लसीकरणासोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आणखी एका योजने संदर्भात महत्त्वाची घोषणा केली आहे. या अतंर्गत ८० कोटी गरीबांना मोफत (Free Grocery) धान्य दिलं जाणार आहे.

मोदी म्हणाले की, गेल्या वर्षी लॉकडाउन (Lockdown) लावावे लागले होते तेव्हा पंतप्रधान गरीब कल्याण अन्न योजनेंतर्गत ८० कोटी देशवासियांना ८ महिन्यांसाठी मोफत रेशन देण्यात आले होते. दुसर्‍या लाटेमुळे ही योजना मे आणि जूनमध्येही वाढवण्यात आली. आज सरकारनं निर्णय घेतला आहे की ही योजना आता दिवाळीपर्यंत वाढवण्यात येईल. नोव्हेंबरपर्यंत 80 कोटी गरीबांना निश्चित प्रमाणात मोफत धान्य दिले जाईल. माझ्या गरीब भाऊ-बहिणींपैकी कुणीही कुणालाही उपाशी झोपावे लागू नये.

याशिवाय ते म्हणाले की, कोरोनाची दुसरी लाट (Corona Second Wave) आणि याच्यासोबत आपला लढा सुरू आहे. आपल्यातील बर्‍याच जणांनी आपले नातेवाईक आणि ओळखीचे लोक गमावले आहेत. अशा सर्व कुटूंबियांबद्दल मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. गेल्या १०० वर्षातील ही सर्वात मोठी महामारी आहे. आधुनिक जगानं असा साथीचा रोग कधी पाहिलेला किंवा अनुभवला नव्हता.

मोदी म्हणाले की, इतक्या मोठ्या जागतिक महामारीमध्ये आपला देश बर्‍याच गोष्टींसोबत एकत्र लढा देत आहे. कोविड हॉस्पिटल (Covid Hospital) बनवण्यापासून आयसीयू बेडची संख्या वाढवणं, व्हेंटिलेटर बनवण्यापासून ते चाचणी प्रयोगशाळेचे जाळे तयार करण्यापर्यंत अनेक कामं देशानं केली आहेत. गेल्या दीड वर्षात देशात नवीन आरोग्य पायाभूत सुविधा निर्माण झाल्या आहेत.



हेही वाचा

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत चिमुकल्यांची 'अशी' काळजी घ्या

'स्पुटनिक’साठी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजसोबत महापालिकेची चर्चा सुर

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा