COVID-19 रुग्णांमध्ये वाढ होऊनही सीलबंद इमारतींमध्ये घट का होतेय?

(Representational Image)
(Representational Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) उघड केलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईतील कोरोनाव्हायरस प्रकरणांमध्ये झपाट्यानं वाढ होत आहे. तरीही सील केलेल्या इमारतींच्या संख्येत घट झाली आहे.

माहितीनुसार, २५ डिसेंबर रोजी संपूर्ण शहरात सील केलेल्या इमारतींची संख्या १७ होती, ती ३० डिसेंबर २०२१ रोजी ८८ वर पोहोचली. नंतर, १ जानेवारी, २०२२ रोजी, सीलबंद इमारतींची संख्या १५७ पर्यंत वाढली, जी पुढे ३८९ वर गेली. ४ जानेवारी आणि ५ जानेवारी रोजी अनुक्रमे ४६२ इमारती सील करण्यात आल्या.

कमी मजले आणि फ्लॅट्स असलेल्या छोट्या इमारतींना येणाऱ्या समस्या लक्षात घेऊन पालिकेनं सीलबंद इमारतींसाठी सुधारित मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली. त्यानंतर सील इमारतींच्या संख्येत घट पाहायला मिळाली.

सीलबंद इमारतींची संख्या ७ जानेवारी रोजी १२३ पर्यंत घसरली. ८ जानेवारीला ती १२० पर्यंत खाली आली. ही संख्या ९ जानेवारी रोजी १२३ वर गेली आणि दुसऱ्या दिवशी १६८ वर गेली आणि नंतर ११ जानेवारी रोजी ६३ पर्यंत घसरली.

४ जानेवारीपासून प्रशासकिय संस्थेनं जाहीर केलेल्या सुधारित सीलबंद इमारतीच्या मार्गदर्शक तत्त्वांमुळे सीलबंद इमारतींच्या संख्येत घट झाली असं अधिकारी मानतात. कोविड-19 प्रकरणांमध्ये झालेली वाढ तसंच ओमिक्रॉन या अतिसंक्रमित प्रकाराच्या धोक्यामुळे हा निर्णय घेण्यात आला.


हेही वाचा

रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचा आकडा वाढू शकतो - पालिका

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांची 'हात जोडून विनंती'; ''म्हणाल्या...''

पुढील बातमी
इतर बातम्या