Advertisement

रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचा आकडा वाढू शकतो - पालिका

पालिकेनं येत्या काही दिवसांत रुग्णालयात दाखल होण्याच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.

रुग्णालयात दाखल होणाऱ्यांचा आकडा वाढू शकतो - पालिका
SHARES

सलग चार दिवस कोरोनाव्हायरसच्या रुग्णांमध्ये आणि मृत्यूदरात घट होत आहे. असं असलं तरी बृहन्मुंबई महानगरपालिकेनं (BMC) येत्या काही दिवसांत रुग्णालयात दाखल होण्याच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता वर्तवली आहे.

मुंबईत मंगळवारी, ११ जानेवारी रोजी जवळपास ११,००० नवीन प्रकरणं नोंदवली गेली. गेल्या आठवड्यात, शहरातील दैनिक COVID-19 ची संख्या २०,००० च्या वर गेली होती. तथापि, त्या काळात रूग्णांचे रूग्णालयात दाखल होण्याचे प्रमाण कमी होते आणि त्यापैकी ८५% पेक्षा जास्त लक्षणं नसलेले रुग्ण होते.

सुमारे ६ लाख रूग्ण होम क्वारंटाईनमध्ये आहेत आणि त्यापैकी काही येत्या दिवसांत दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या आठवड्यात आणि पुढच्या आठवड्यात हॉस्पिटलमध्ये दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे, असं पालिकेच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.

आता अनेक हॉटेल्स मुंबई विभागातील पॉझिटिव्ह रुग्णांना क्वारंटाईनसाठी जागा देत आहेत. त्यापैकी काहींची यादी इथं आहे.

तिसऱ्या लाटेसंदर्भात अधिकाऱ्यानं सांगितलं की, जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत घट होण्याची अपेक्षा होती. मात्र शहरात गेल्या काही दिवसांपासून केसेस कमी झाल्या आहेत. आठवडाअखेरपर्यंत ही पडझड कायम राहिल्यास तिसरी लाट ओसरली असं म्हणता येईल.

महाराष्ट्र कोविड-19 टास्क फोर्सचे सदस्य डॉ शशांक जोशी यांनी मंगळवार, ११ जानेवारी रोजी सांगितलं की, शहरातील कोविड-19 लाट कमी होत आहे.



हेही वाचा

राज्यात तब्बल 'इतक्या' जणांनी लसीचा एकही डोस घेतला नाही

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकरांची 'हात जोडून विनंती'; ''म्हणाल्या...''

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा