Advertisement

राज्यात तब्बल 'इतक्या' जणांनी लसीचा एकही डोस घेतला नाही

मुंबईत लसीकरण सुरू होऊन बराच कालावधी झाला तरी, अद्याप अनेकांनी लस घेतलेली नाही. याची आकडेवारी पाहिली अशता धोक्याची शक्यता वर्तवली जात आहे.

राज्यात तब्बल 'इतक्या' जणांनी लसीचा एकही डोस घेतला नाही
SHARES

कोरोनाला आळा घालण्यासाठी लसीकरण हा जालीम उपाय मानला जात आहे. त्यामुळं मुंबईसह राज्यभरात लसीकरण केलं जात आहे. नागरिकांनी लसवंत व्हावं यासाठी महापालिका वारंवार आव्हान करत आहे. त्यानुसार, मुंबईच्या विविध भागांत लसीकरण सुरू असून, नागरिक लस घेत आहेत. मात्र, एक धक्कादायक बाब समोर येत आहे, मुंबईत लसीकरण सुरू होऊन बराच कालावधी झाला तरी, अद्याप अनेकांनी लस घेतलेली नाही. याची आकडेवारी पाहिली अशता धोक्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

राज्यातील ९८ लाख नागरिकांनी आतापर्यंत कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही. महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक लसीकरण झालेले राज्य आहे. परंतु, दुसऱ्या बाजूला लोकसंख्येचा एक मोठा टप्पा लसीकरणापासून दूर राहिल्याचेही स्पष्ट झालं आहे.

एकीकडे राज्यात फ्रंटलाईन वर्कर्स आणि ज्येष्ठ नागरिकांना प्रिकॉशन डोस व बुस्टर डोस मिळायला सुरुवात झाली असतानाच महाराष्ट्रात कोरोना लशीचा एकही डोस न घेतलेल्या नागरिकांची संख्या खूपच जास्त असल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ऑक्सिजन लागणाऱ्या किंवा अतिदक्षता विभागात दाखल कराव्या लागणाऱ्या रुग्णांपैकी बहुतांश जणांनी कोरोना लस घेतलेली नाही. काहीजणांनी लसीचा केवळ एकच डोस घेतलेला आहे. त्यामुळं राज्यातील सर्व नागरिकांना लस देण्यासाठी प्रशासनानं पुन्हा एकदा जोरदार प्रयत्न सुरु केले आहेत.

कोरोना लस घेतलेल्या नागरिकांना सध्या करोनाची लागण होत असली तरी त्यांच्यामधील लक्षणे सौम्य आहेत. परंतु, लस न घेतलेल्या नागरिकांच्या आजाराची तीव्रता जास्त आहे. त्यामुळे कोरोना लस ही उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे नागरिकांनी करोना लस घ्यावी, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले होते.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा