शाळांच्या वेळापत्रकात बदल करण्याची मागणी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

यंदा अल निनोमुळे महाराष्ट्रात (maharashtra) मान्सूने (monsoon)येण्यास विलंब केला आहे. जून महिन्याचे 15 दिवस उलटून गेल्यानंतरही पावसाचे राज्यातील बहुतांश भागात आगमन झालेले नाही.

पाऊस नसल्यामुळे तापमानात (temperature) प्रचंड वाढ झाली आहे. यामुळे ऊन आणि उकाड्याने विद्यार्थी आणि पालक हैराण झाले आहेत. त्यामुळे विद्यार्थी व पालकांकडून शाळांचे (school) वेळापत्रक बदलण्याची मागणी होऊ लागली आहे.

वाढत्या तापमानामुळे पुढील 15 दिवस दुपारच्या सत्रातील शाळा, सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांनी शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे केली आहे.

विदर्भ वगळता राज्यभरातील शाळा 15 जूनपासून सुरू झाल्या आहेत. मात्र दुपारच्या सत्रात शाळांमध्ये जाणारे विद्यार्थी उन्हाच्या झळा आणि उकाड्याने हैराण होऊ लागले आहेत. यामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.

विशेषतः ग्रामीण भागांतील अनेक शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची कमतरता, अपुरा वीजपुरवठा तसेच लोखंडी पत्र्यांच्या वर्गखोल्यांमुळे विद्यार्थ्यांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे.

विद्यार्थ्यांचे आरोग्य, सुरक्षितता लक्षात घेता शाळांच्या वेळापत्रकात तात्पुरते बदल करण्याची मागणी पालकांकडून होत आहे. पावसाळा सुरू होईपर्यंत सकाळच्या सत्राचा पर्याय स्वीकारावा, अशी मागणीही होत आहे.


हेही वाचा

मुंबईहून पुणे फक्त 48 मिनिटांत पोहोचता येणार

बेस्ट कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा

पुढील बातमी
इतर बातम्या