लाचखोरांविरुद्ध कारवाई हा निर्धार; नागरिकांना माहिती कळविण्याचे आवाहन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

‘लाचखोरांविरुद्ध कारवाई हा निर्धार’ असा ध्यास असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचा दि. २७ ऑक्टोबर २०२० ते ०२ नोव्हेंबर २०२० या कालावधीत ‘दक्षता जनजागृती सप्ताह-२०२०’ साजरा करण्यात येणार आहे. अशा प्रकारचा सप्ताह संपूर्ण देशभर साजरा करण्यात येत आहे. सुजाण नागरिकांनी तसेच अन्य कोणीही राज्य सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी भ्रष्टाचार करताना किंवा भ्रष्टाचारात गुंतलेला आढळल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, बृहन्मुंबई विभाग, मुंबई, येथे संपर्क साधावा, असे आवाहन या सप्ताहानिमित्त लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबईचे अपर पोलीस आयुक्त लखमी गौतम यांनी  केले आहे.

हेही वाचाः- “स्वतःला वाघ म्हणवणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी कुणाला कधी कानाखाली तरी दिली आहे का?”

लॉकडाऊननंतर मुंबई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने(एसीबी)  पून्हा एकदा जोर धरला आहे. एसीबीने केलेल्या  कारवाईत चालू वर्षाची आणि मागील वर्षाची तुलना केली असता. मागच्या वर्षीच्या तुलनेत २८ टक्क्यांनी घट झाली आहे. एसीबीने १० महिन्यात ५०६ कारवाई केली आहे. त्यात ६९४ आरोपींना अटक केली आहे. तर २०१९ मध्ये ७०६ कारवाई करण्यात आल्या असून ९५९ जणांना अटक करण्यात आली होती. एसीबीने आतापर्यंत केलेल्या कारवाईत सर्वाधिक पुण्यात कारवाई केलेल्या आहेत. पुण्यात ११८ कारवाई करण्यात आली आहे. त्यानंतर नाशिक ८७, अमरावती ७९, नागपूर ७५, औरंगाबाद ६७, नांदेड ६१, ठाणे ३५ आणि मुंबईत १८ गुन्ह्यांची नोंद आहे.

 हेही वाचाः- राज्यातून परतीच्या पावसाला आजपासून सुरुवात

एसीबीचे प्रमाण जरी कमी झाले असले तरी पूर्णतहा राज्यातील भ्रष्टाचार अद्याप संपलेला नाही. त्यामुळेच ‘दक्षता जनजागृती सप्ताह-२०२०’ अंतर्गत गृहमंत्र्यांनी नागरिकांना भ्रष्ट अधिकाऱ्यांची तक्रार देण्याचे आवाहन केले आहे. तक्रार करायची झाल्यास नागरिकांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, मुंबई विभाग, ९१, सर पोचखानवाला मार्ग, वरळी, मुंबई. येथील टोल फ्री क्र.१०६४, दूरध्वनी क्र.-०२२-२४९२१२१२, फॅक्स क्र.०२२-२४९२२६१८ वर संपर्क साधावा.

        वेबसाईट : acbmaharashtra.gov.in

        ई-मेल   : acbwebmail@mahapolice.gov.in

        ई-मेल    : addlcpacbmumbai@mahapolice.gov.in

        फेसबुक  : www.facebook.com-Maharashtra-ACB.

        मोबाईल ॲप : www.acbmaharashtra.net

        ट्वीटर   : @ACB_Maharashtra

        व्हॉटस्‌ ॲप : 9930997700

भ्रष्टाचार हा विकास कामातील सर्वात मोठा अडथळा आहे. भ्रष्टाचारामुळे समाजाचे होणारे नुकसान टाळण्यासाठी दक्षता जनजागृतीसारखे उपक्रम केवळ आठवडाभर न राबविता नियमितपणे राबविले गेले पाहिजे. याकामी खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी आणि सुजाण नागरिक मोठी मदत करु शकतात, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत करण्यात आले आहे.

पुढील बातमी
इतर बातम्या