प्रभादेवीमध्ये गॅस गळतीच्या दोन तक्रारी, स्थानिक हादरले

(Representational Image)
(Representational Image)
  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

रविवारी, १३ डिसेंबर रोजी सकाळी मुंबईतील प्रभादेवी परिसरातील खेड गल्ली इथं गॅस गळतीची घटना घडली. स्थानिकांना गळतीचं कळताच त्यांनी पोलिसांना माहिती दिली. मात्र अग्निशमन दलाचे जवान तातडीनं घटनास्थळी दाखल झाले.

दरम्यान, त्याच दिवशी प्रभादेवी इथून दुसरी गॅस गळतीची तक्रार दाखल झाली. त्यानंतर पुन्हा एकदा अग्निशमन दलाला बोलावण्यात आलं. दिवसभरात दुसरी तक्रार आल्यानं अग्निशमन दलाने दोनदा घटनास्थळी धाव घेतली. पण या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये भितीचं वातावरण होतं.

वृत्तानुसार, दुपारी १ वाजण्याच्या सुमारास श्री साई विस्मय, काका साहेब गाडगीळ मार्ग, दादर (प) जवळ गॅस पाइपलाइन खराब झाल्याचं समोर आलं. महानगर गॅस लिमिटेड (MGL)ची टीम घटनास्थळी पोहोचली. त्यानंतर परिसरातील गॅस पुरवठा तात्पुरता थांबवण्यात आला. दुरुस्तीचे काम लवकरच पूर्ण झाले आणि गॅस पुरवठा देखील पूर्ववत झाला. शिवाय, खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी तपासणी दरम्यान परिसरात बंदोबस्त ठेवला होता.

एका स्थानिक रहिवाशानं सांगितलं की, सकाळी गॅस पाईप गळती झाली होती परंतु दुपारी कचर्‍याच्या डब्यातून धूर निघून गेल्यानंतर त्यांना कळालं. लवकरच त्यांनी १०० नंबरवर कॉल करून पोलिसांना बोलावलं आणि लवकरच त्यांनी बचावकार्य सुरू केलं.

मात्र, सायंकाळी उशिरा या भागातून आणखी एक तक्रार आली. अग्निशमन दलानं पुन्हा घटनास्थळी धाव घेतली. एमजीएलच्या सूत्रांनी सांगितलं की, त्यांचे अभियंता त्या ठिकाणी होते. तथापि, गळतीचे कारण अद्याप समजू शकलेलं नाही.


हेही वाचा

कोरोना गाईडलाईन्सचं उल्लंघन करणाऱ्या 'या' रेस्टॉरंट्सवर पालिकेची कारवाई

कबुतरांना खायला घालण्यावर ठाणे महापालिकेची बंदी

पुढील बातमी
इतर बातम्या