Advertisement

कोरोना गाईडलाईन्सचं उल्लंघन करणाऱ्या 'या' रेस्टॉरंट्सवर पालिकेची कारवाई

कोरोनाच्या (Coronavirus) गाइडलाइन्सचं उल्लंघन केल्यानं पालिकेनं मुंबईतील ४ मोठ्या रेस्टॉरंट्सवर कारवाई केली आहे.

कोरोना गाईडलाईन्सचं उल्लंघन करणाऱ्या 'या' रेस्टॉरंट्सवर पालिकेची कारवाई
SHARES

कोरोना रुग्णांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. असं असली तरी नागरिकांना परिस्थितीचं गांभीर्य अजूनही कळालं नाही. आजही रस्त्यावर विना मास्क नागरिक वावरताना पाहायला मिळतात. आता त्यात आणखी भर पडली ती हॉटेल आणि रेस्टॉरंट सुरू करण्याची परवानगी दिल्यानं. 

कोरोनाच्या (Coronavirus) गाइडलाइन्सचं उल्लंघन केल्यानं पालिकेनं मुंबईतील ४ मोठ्या रेस्टॉरंट्सवर कारवाई केली आहे. पबमध्ये विना मास्क गर्दी करून हुल्लडबाजी करणारे २७५ जणांवर कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये बॉम्बे अड्डा, प्रीतम रुड लान्ज, भगवती या ४ मोठ्या हॉटेल्सचा समावेश आहे.     

मिळालेली माहिती अशी की, मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी रविवारी रात्री एकूण दोन हॉटेलवर छापेमारी केली. त्यात बॉम्बे अड्डा या पबचा समावेश आहे. बॉम्बे अड्डा इथं विना मास्क आढळून आलेल्या २७५ जणांकडून ३० हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तर दादर येथील एका हॉटेलमध्ये १२० जणांकडून विना मास्कचा दंड वसूल करून त्यांना सगळ्यांना मास्क देण्यात आले.

तर इतर दोन हॉटेलमधून देखील दंड वसूल करण्यात आता. जवळपास चारही हॉटेलमधून ४३ हजार २०० रुपये इतका दंड वसूल झाला. आता मास्क कारवाईत जमलेल्या रकमेतून नागरिकांना पालिका मास्क विकत घेऊन वाटप करणार आहे, असं इक्बालसिह चहल यांनी सांगितलं आहे.

ख्रिसमस आणि ३१ डिसेंबरला जल्लोष साजरा करण्यासाठी तरूणाई सज्ज आहे. पण कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेनं काही नियमावली जाहीर केली आहे. याच नियमांचं काठेकोरपणे पालन होतं की नाही हे पाहण्यासाठी पालिकेनं मोहीम सुरू केली आहे. या अंतर्गतच मुंबईतल्या पब्स आणि रेस्टॉरंट्सची पालिका अधिकाऱ्यांकडून पाहणी केली जात आहे.

मुंबईचे आयुक्त इकबालसिंह चहल यांनी एक इशारा दिला आहे. कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास मुंबईत नाईट कर्फ्यू (Mumbai Night curfew) लावण्यात येईल, असं आयुक्तांनी सांगितलं आहे. ते म्हणाले की, मुंबईत छापेमारी करण्यात आली होती. यावेळी हजारो लोक हे मास्क न लावता क्लबमध्ये पाहण्यात आले होते.

लोक असेच वागत राहिले तर मुंबईत नाईट कर्फ्यू लावण्यात येईल. याबाबत मुंबईत नाईट कर्फ्यू लागू करण्याची मागणी केली आहे. नागरिकांना १५ दिवसांचा वेळ दिला आहे. त्यांनी आपले वर्तन सुधारलं नाही तर आम्हाला नाईलाजानं नाईट कर्फ्टू लागू करावा लागेल.




हेही वाचा

कबुतरांना खायला घालण्यावर ठाणे महापालिकेची बंदी

मुंबईतल्या 'या' भागातील गटारात आढळला कोरोना विषाणू

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा