Advertisement

मुंबईतल्या 'या' भागातील गटारात आढळला कोरोना विषाणू

हैदराबादनंतर आता कोरोना विषाणू मुंबईच्या गटारात सापडला आहे.

मुंबईतल्या 'या' भागातील गटारात आढळला कोरोना विषाणू
SHARES

हैदराबादनंतर आता कोरोना विषाणू मुंबईच्या गटारात सापडला आहे. जगातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीसह सहा झोपडपट्ट्यांमधल्या गटारांमध्ये वैज्ञानिकांना कोरोना विषाणू सापडला आहे. धारावी व्यतिरिक्त वडाळा, शिवाजी नगर, कुर्ला, कांजूर, मालाड या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोनच्या संसर्गामुळे विषाणू सांडपाण्याच्या ठिकाणी पोहोचला आहे.

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी पोलिओ मॉडेलच्या आधारे गटारांचे नमुने घेतले होते. मुंबईच्या सहा वेगवेगळ्या झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना विषाणूची उपस्थिती शोधली आहे.

शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, २००१ मध्ये पोलिओ संसर्गाबाबत असेच निरीक्षण केलं गेलं होतं. कोरोना साथीच्या आधी या सहा झोपडपट्ट्यांमधून नमुने घेण्यात आले होते. त्यानंतर ११ ते २२ मे दरम्यान लॉकडाऊन दरम्यान २० नमुने घेण्यात आले आहेत.

वैज्ञानिकांचं म्हणणं आहे की, गटारातील पाण्याची तपासणी तीन थरांत केली जाते. वरच्या आणि खालच्या थरांशिवाय कोरोना विषाणूचा विषाणू मध्यम थरात आढळतो, जो प्रथम पाहिला आहे. आतापर्यंत, जगातील कोणत्याही देशात याबद्दल पुष्टीकरण झालेलं नाही.

डॉ. दीपा कैलास शर्मा म्हणाले की, नेदरलँडमधील वैज्ञानिकांनी कोरोना विषाणूबद्दल जगाला प्रथम सांगितले. यापूर्वी लवकरच हैदराबादमधील सीसीएमबीच्या वैज्ञानिकांनीही गटारात कोरोना विषाणूची पुष्टी केली होती. या आधारावर, मोठ्या झोपडपट्ट्यांची निवड केली गेली. जेथे मोठ्या संख्येनं कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत.

अभ्यासानुसार, कोरोना झालेल्या रुग्णांच्या विष्ठेपासून विषाणू गटारापर्यंत पोडोचले. विष्ठा व्यतिरिक्त, संक्रमित रूग्णाच्या आंघोळीतून याशिवाय त्यांच्या साबण, शैम्पू, वॉशिंग पावडर इत्यादीद्वारे हे विषाणू गटारापर्यंत पोहोचू शकले.

११ ते १८  मार्च दरम्यान म्हणजे धारावी आणि वडाळा इथं कोरोनाचा शिरकाव होण्याआधी काही नमुने घेण्यात आले होते. घेतलेले सॅपल नकारात्मक असल्याचे आढळले. त्यानंतर सर्व सहा झोपडपट्ट्यांमधील नमुने घेतले तेही पुन्हा नकारात्मक आढळले.

पण त्यानंतर या भागात कोरोना संक्रमित रुग्ण आढळू लागले. रुग्ण आढळल्यानंतर दोन नमुने घेण्यात आले. अंतिम वेळी घेतलेले सर्व १२ नमुने कोरोना संक्रमित असल्याचे आढळले. काही दिवसांपूर्वी ज्या ठिकाणी कोरोना संक्रमण झाले नाही अशा ठिकाणी कोरोना संसर्ग अवघ्या दीड महिन्यात गटारापर्यंत पोहोचला होता.



हेही वाचा

महापालिका मुंबईत उभारणार ४८ लसीकरण केंद्रे

मुंबईतील कोरोना रुग्णदुपटीचा कालावधी ३०२ दिवसांवर

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा