Advertisement

मुंबईतील कोरोना रुग्णदुपटीचा कालावधी ३०२ दिवसांवर

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं दिसून येत आहे. दररोज होणाऱ्या चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचं प्रमाण घटू लागलं आहे.

मुंबईतील कोरोना रुग्णदुपटीचा कालावधी ३०२ दिवसांवर
SHARES

मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असल्याचं दिसून येत आहे.  दररोज होणाऱ्या चाचण्यांच्या तुलनेत रुग्ण आढळण्याचं प्रमाण घटू लागलं आहे. मृतांची संख्याही कमी होऊ लागली आहे.मुंबईतील कोरोना रुग्णदुपटीचा कालावधी आता तब्बल ३०२ दिवसांवर पोचला आहे. त्यामुळे मुंबईतील कोरोनास्थिती नियंत्रणात येत असल्याचं चित्र आहे.

मुंबईत गुरुवारी नवीन ७९८ रुग्ण आढळले. तर १३ जणांचा मृत्यू झाला. मुंबईतील मृत्युदर ४ टक्के झाला असून मृतांची एकूण संख्या १०,९४८ झाली आहे.एकूण रुग्णांची संख्या २ लाख ८८ हजारांवर गेली आहे. तर आतापर्यंत २ लाख ६४ हजार (९२ टक्के) रुग्ण बरे झाले आहेत. सध्या मुंबईत ११,९४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यामधील केवळ २५०० रुग्णांना लक्षणेआहेत.

मुंबईतील रुग्णवाढीचा दर घसरून ०.२३ टक्के झाला आहे. दर दिवशी आठशेच्या आत रुग्ण आढळत आहेत. मागील  आठवडाभर रोज १६ हजारांहून अधिक चाचण्या केल्या जात आहेत. आतापर्यंत २० लाख ४४ हजारांहून अधिक चाचण्या करण्यात आल्या आहेत.



हेही वाचा  -

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी १ हजार झाडांवर कुऱ्हाड

ई-चलन न भरल्यास लायसन्स होणार रद्द, दंड न भरलेल्या २ हजार जणांचे परवाने होणार रद्द



Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा