Advertisement

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी १ हजार झाडांवर कुऱ्हाड

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी १ हजार ४ झाडे हटविण्यासंदर्भातील प्रस्तावाला मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडून मंजुरी देण्यात आली आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी १ हजार झाडांवर कुऱ्हाड
SHARES

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी १ हजार ४ झाडे हटविण्यासंदर्भातील प्रस्तावाला मुंबई महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीकडून मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळं कामात अडथळा ठरणारी झाडे हटविण्यास महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीची मंजुरी प्रकल्पाचं काम लवकरच पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

हा प्रकल्प २२ किमी लांबीचा आहे. ठाणे खाडीवर त्यासाठी पूल बांधण्यात येणार आहे. पुलामुळं शिवडी, नवी मुंबई विमानतळ, जेएनपीटी, रायगड, पुणेपर्यंतचा प्रवास कमीत कमी वेळेत होणार पुलाच्या बांधकामात बाधा आणणारे तब्बल १००४ झाडे हटविण्यात येणार पुलाच्या जागेत बाधा आणणाऱ्या १ हजार १७२ झाडांचा समावेश. तर त्यापैकी १००४ झाडे हटविणे गरजेचं आहे.

यामध्ये ४५४ झाडे कापण्यात येणार आहेत. ५५० झाडे ही हटवून पुनर्ररोपित करण्यात येणार आहेत. तर १६८ झाडे ही आहे त्याच ठिकाणी तशीच ठेवण्यात येणार आहेत. एमएमआरडीए तर्फे पालिकेकडे सदर झाडे हटविण्याबाबतचा प्रस्ताव १८ जून २०१८ रोजी मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. कागदपत्रांची पूर्तता ही ५ ऑक्टोबर २०२० रोजी करण्यात आली.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा