Advertisement

महापालिका मुंबईत उभारणार ४८ लसीकरण केंद्रे

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कोरोना लसीचं वितरण करण्यासाठी ४८ केंद्र सुरू करणार आहेत.

महापालिका मुंबईत उभारणार ४८ लसीकरण केंद्रे
SHARES

बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC) कोरोना लसीचं वितरण करण्यासाठी ४८ केंद्र सुरू करणार आहेत. कोरोना लस सर्व सामान्यांसाठी उफलब्ध झाल्यावर जवळपास १.२ कोटीहून अधिक लोकसंख्येला ती देण्यात येईल. यासाठीच पालिका पुर्व तयारी करत आहे.

पालिका अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, प्रशासकीय प्रभागात प्रत्येकी दोन ते तीन लसीकरण केंद्रे असतील. तथापि, केंद्रानं त्यासाठी मार्गदर्शक सूचना दिल्यानंतर अंतिम वितरणाची योजना निश्चित केली जाईल. याव्यतिरिक्त, खासगी संस्थांनाही लस वितरणासाठी परवानगी दिल्यास वितरण केंद्रांची संख्याही वाढेल, अशी माहिती पालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

सुरुवातीला फ्रंटलाइन कामगारांना कोरोना लस देण्यात येईल. त्यानंतर ज्येष्ठ नागरिक आणि अल्पवयीनांना कोरोना लशीकरण केलं जाईल.

दरम्यान, गुरुवारी, १० डिसेंबर रोजी महाराष्ट्रात कोरोनाचे ३ हजार ८२४ रुग्ण आढळले. त्यानुसार कोरोना रुग्णांचा आकडा १८ लाख ६८ हजार १७२ च्या घरात गेला आहे. राज्यात सध्या ७१ हजार ८१० सक्रिय रुग्ण आहेत. ५ लाख ४१ हजार ०५९ रुग्ण क्वारंटाईनमध्ये आहेत. तर दिवसभरात ५ हजार ००८ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. बरे झालेल्यांची संख्या १७ लाख ४७ हजार १९९ इतकी आहे.

शिवाय, साथीच्या आजारामुळे राज्यात एकूण ४७ हजार ९७२ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. ५ लाख ४१ हजार ०५९ नागरिक होम क्वारंटाईन आहेत. तर ५ हजार १३७ जणांचे संस्थात्मक विलगिकरण केले आहे.



हेही वाचा

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ड्रेसकोड लागू, जीन्स, टी-शर्ट, स्लिपर्स नाही चालणार

नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ९० रुग्ण

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा