Advertisement

नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ९० रुग्ण

नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ९० रुग्ण सापडले आहेत. तर २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४९ हजार ४७७ झाली आहे.

नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ९० रुग्ण
SHARES

नवी मुंबईत शुक्रवारी कोरोनाचे नवीन ९० रुग्ण सापडले आहेत. तर २ रुग्णाचा मृत्यू झाला आहे. येथील एकूण रुग्णांची संख्या आता ४९ हजार ४७७ झाली आहे. 

शुक्रवारी नवी मुंबईमध्ये आढळलेल्या रुग्णांमध्ये बेलापूर २६, नेरुळ ११, वाशी १२, तुर्भे १२, कोपरखैरणे ५, घणसोली ८, ऐरोलीतील १६ रुग्णांचा समावेश आहे. तर ९४ जणांनी कोरोनावर मात केली आहे. 

बेलापूर १९, नेरुळ १५, वाशी ६, तुर्भे ८, कोपरखैरणे १६, घणसोली १०, ऐरोलीतील १९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ४७,१४० झाली आहे. तर मृतांचा आकडा १००९ झाला आहे. नवी मुंबईत सध्या १३२८ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर कोरोनामुक्तीचा दर ९५ टक्के झाला आहे. 

डिसेंबर महिन्याच्या पहिल्या १० दिवसात ११३६ पॉझिटिव्ह रूग्ण सापडलेले असून १३८४ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तसेच २३ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.

कोरोना नियंत्रणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्याला नागरिकांचीही साथ मिळत असून दिवाळीनंतर दुसरी लाट येण्याचा धोका संभवत असताना कोरोना रूग्णसंख्येत मात्र तितकीशी  वाढ होत नसल्याचे काहीसे दिलासाजनक चित्र दिसून येत आहे.हेही वाचा  -

मुंबई ट्रान्स हार्बर लिंक प्रकल्पासाठी १ हजार झाडांवर कुऱ्हाड

ई-चलन न भरल्यास लायसन्स होणार रद्द, दंड न भरलेल्या २ हजार जणांचे परवाने होणार रद्दRead this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा