मुसळधार पावसामुळे भाजीपाला महागला

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मागील शनिवारी आणि रविवारी मुंबईसह उपनगरात पावसानं जोरदार बॅटींग केली. या मुसळधार पावसामुळं सखल भागांत पाणी साचल्यानं जनजीवन विस्कळीत झालं होतं. तसंच, याचा फटका रेल्वे आणि रस्ते वाहतुकीवर देखील झाला. मात्र, या पावसाचा परिणाम आता भाजीपाल्यांवरही झाला असून मुंबईतील होलसेल मार्केटमध्ये बाजारभाव वाढले आहेत. तसंच पाणी साचल्यानं भाजीपालाही खराब होतं आहे.

भाजीपाल्याची आवक

बाजारसमितीच्या भाजी मार्केटमध्ये सोमवारी तब्बल ६७५ ट्रक व टेम्पोमधून भाजीपाल्याची आवक झाली. मुसळधार पावसापूर्वी १० ते १५ रुपयांना विकला जाणाऱ्या फ्लॉवरचे दर १५ ते २५ रुपये ऐवढे झाले आहेत. भेंडीचे दर २० ते ३० रुपये झाल्यामुळं सामान्यांना भाजीपाला खरेदी करताना नेहमीपेक्षा जास्त पैसे मोजावे लागत आहेत.

ग्राहकांची संख्या कमी

राज्यभरातून आलेल्या भाजीपाल्याची ग्राहकांची संख्या कमी असल्यानं विक्री होऊ शकली नाही. तसंच, अनेक भाज्या या पावसाच्या पाण्यात भिजून खराब झाल्या. त्यामुळं विक्रेत्यांनी त्यांच्याकडं असलेल्या भाजीपाल्याची जास्त दर लावून विक्री केली.

होलसेल दर (प्रतिकिलो)

वस्तू 

३ ऑगस्ट  (दर प्रतिकिलो)

५ ऑगस्ट (दर प्रतिकिलो)

भेंडी

२० ते ३०         

२५ ते ४४

फ्लॉवर

१० ते १४      

१५ ते २५

गवार

४० ते ४८        

 ४० ते ६०

घेवडा

२६ ते ३४        

३५ ते ४५

काकडी

१३ ते २०   

१५ ते ३०

कारली

१६ ते २० 

२४ ते २८


हेही वाचा -

मुंबईकरांचं पाण्याचं टेन्शन मिटलं, तलावांत वर्षभर पुरेल इतकं पाणी जमा

बेस्ट कर्मचाऱ्यांचा मंगळवारी मध्यरात्रीपासून संप?


पुढील बातमी
इतर बातम्या