Advertisement

बेस्ट कर्मचाऱ्यांचा मंगळवारी मध्यरात्रीपासून संप?

बेस्ट बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण, वेतनकरारासह अन्य मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांचा मंगळवारी मध्यरात्रीपासून संप?
SHARES

बेस्ट बसनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक महत्वाची बातमी आहे. कारण, वेतनकरारासह अन्य मागण्यांसाठी बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुन्हा एकदा संपावर जाण्याचा इशारा दिला आहे. बेस्ट कर्मचारी मंगळवारी मध्यरात्रीपासून संपावर जाणार असल्याची शक्याता वर्तवली जात आहे. मात्र, कामगार संघटनांबरोबर वाटाघाटी सुरू असल्यानं संप करू नये, असं आवाहन बेस्ट प्रशासनानं केलं आहे. परंतु, कामगार संघटना आपल्या निर्णयावर ठाम असल्यानं या प्रश्नावर मंगळवारी पुन्हा बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीनंतरट कामगारांच्या संपाबाबत आपली भूमिका मान्यताप्राप्त संघटना बेस्ट वर्कर्स युनियन स्पष्ट करणार आहे. त्यामुळं आता सर्वांचंच लक्ष या बैठकीकडं लागलं आहे.

चर्चेसाठी बोलावलं नाही

बेस्ट कामगार संघटनांनी सुधारित वेतनश्रेणी, कामगार वसाहतींची दुरुस्ती यांसारख्या विविध मागण्यांसाठी जानेवारी महिन्यात संप पुकारला होता. हा संप नऊ दिवस चालल्यानंतर उच्च न्यायालयानं नियुक्त केलेल्या मध्यस्थीच्या माध्यमातून बेस्ट प्रशासन आणि कामगार संघटनांमध्ये वाटाघाटी सुरू झाली. मात्र, सामंजस्य करार झाल्यानंतर बेस्ट प्रशासनानं चर्चेसाठी बोलावलेच नाही, असा आरोप करीत बेस्ट वर्कर्स युनियननं ६ ऑगस्ट मध्यरात्रीपासून पुन्हा एका संपावर जाण्याचाा इशारा दिला आहे. त्यामुळं ७ ऑगस्ट रोजी साजरा होणाऱ्या ७३व्या बेस्ट दिनावर या वर्षी संपाचं सावट येण्याची शक्यता आहे.

बेस्ट कामगारांचा मेळावा

कृती समितीनं संपाची रणनीती ठरवण्यासाठी बेस्ट कामगारांचा मेळावा मंगळवारी संध्याकाळी ५ वाजता मुंबईतील शिरोडकर हॉल येथे आयोजित केला आहे. तत्पूर्वी कृती समितीचे प्रतिनिधी आणि बेस्ट अधिकारी यांच्यात मंगळवारी दुपारी २ वाजता बैठक होणार आहे. त्यानंतर होणाऱ्या कामगार मेळाव्यात संपाविषयी चर्चा केली जाणार आहे.

वेतन कराराच्या प्रतीक्षेत

बेस्ट कर्मचाऱ्यांची वेतन कराराची मुदत ३१ मार्च २०१६ रोजी संपली आहे. तेव्हापासून कर्मचारी वेतन कराराच्या प्रतीक्षेत आहेत. या मागण्यांसाठी जानेवारी महिन्यात संप केला होता. त्यानंतर बेस्ट प्रशासन व कर्मचारी संघटनांत सामंजस्य करार झाला आणि एप्रिल २०१७ पासून भरती झालेल्या कर्मचाऱ्यांना ऊर्वरित दहा वेतनवाढी मंजूर करून त्यांची तातडीनं अंमलबजावणीही करण्यात आली. वेतनवाढीसंदर्भात अन्य मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बेस्ट प्रशासनाला ४ पत्रे देण्यात आली, मात्र कोणताही प्रतिसाद न मिळाल्यानं ६ ऑगस्टच्या मध्यरात्रीपासून संपाचा निर्णय घेण्यात आला आहे.

२० टक्के वेतनवाढ

सामंजस्य कराराप्रमाणे ज्युनिअर ग्रेडच्या कर्मचाऱ्यांना २० टक्के वेतनवाढ देण्यात आली आहेत. तसंच, लवकरच निवृत्त कर्मचाऱ्यांच्या ग्रॅच्युइटी देण्यात येतील. सुधारित वेतन श्रेणीबाबत कामगार संघटनांबरोबर एक बैठक झाली असून, दुसरी बैठक मंगळवारी बेस्ट भवन इथं बोलाविण्यात आली आहे. त्यामुळे संप करून जनतेला वेठीस न धरता कामगार संघटनांनी थोडं सबुरीनं घ्यावं, असे आवाहन बेस्ट समिती अध्यक्ष अनिल पाटणकर आणि महाव्यवस्थापक सुरेंद्र बागडे यांनी बेस्ट दिनानिमित्त बेस्ट भवनात आयोजित पत्रकार परिषदेत केलं.



हेही वाचा -

निवासी डॉक्टरांची राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक

कांग्रेसचे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांचा शिवसेनेत प्रवेश



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा