Advertisement

कांग्रेसचे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांचा शिवसेनेत प्रवेश

मानखुर्द येथील शिवाजी नगरमधील कॉंग्रेसचे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी शिवसेने प्रवेश केला आहे

कांग्रेसचे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांचा शिवसेनेत प्रवेश
SHARES

मानखुर्द येथील शिवाजी नगरमधील कॉंग्रेसचे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांनी शिवसेने प्रवेश केला आहे. विठ्ठल लोकरे यांनी सोमवारी नगरसेवक पदाचा राजीनामा देत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. शिवाजी नगर परिसरात विठ्ठल लोकरे हे तिन वेळा नगरसेवकपदी निवडून आले आहेत. 

२००५ पर्यंत शिवसेनेत

कॉग्रेस नगरसेवक विठ्ठल लोकरे हे २००५ पर्यंत शिवसेनेत होते. मात्र, पक्षातील अंतर्गत वादामुळं त्यांनी नारायण राणे यांचासोबत शिवसेनेला निरोप देऊन कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. दरम्यान, मानखुर्दमधील शिवाजी नगर इथं तिनवेळा नगरसेवकपदी निवडून आल्यामुळं त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेकडून मानखुर्द मतदारसंघातून उमेद्वारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

उमेदवारी मिळणार?

मानखुर्द मतदारसंघातील समाजवादी पक्षाचे आमदार अबू आजमी यांच्या विरोधात शिवसेना विठ्ठल लोकरे यांनी उमेद्वारी देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळं येत्या आगामी विधानसभा निवडणुकीत विठ्ठल लोकरे यांनी उमेदवारी मिळणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.



हेही वाचा -

मध्य रेल्वेची कर्जत ते बदलापूर रेल्वे सेवा पुर्वपदावर

मध्य रेल्वेची वाहतूक विविध कारणांमुळं विस्कळीत, प्रवाशांचे हाल



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा