Advertisement

मध्य रेल्वेची वाहतूक विविध कारणांमुळं विस्कळीत, प्रवाशांचे हाल

रोज 'मरे' त्याला कोण 'रडे', अशी परिस्थिती पुन्हा एकदा मध्य रेल्वेवर ओडावली आहे. कारण मुसळधार पावसाचा फटका बसलेली मध्य रेल्वेची कर्जत ते बदलापूर लोकल सेवा सुरू झाली. मात्र, आसनगाव-कसारा लोकल सेवा विस्कळीत झाली आहे.

मध्य रेल्वेची वाहतूक विविध कारणांमुळं विस्कळीत, प्रवाशांचे हाल
SHARES

रोज 'मरे' त्याला कोण 'रडे', अशी परिस्थिती पुन्हा एकदा मध्य रेल्वेवर ओडावली आहे. कारण मुसळधार पावसाचा फटका बसलेली मध्य रेल्वेची कर्जत ते बदलापूर लोकल सेवा सुरू झाली. मात्र, आसनगाव-कसारा लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. तसंच, खडवली- वाशिद स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाला आहे. त्यामुळं मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.

अनेक लोकल रद्द

आसनगाव-कसारा लोकल सेवा मंगळवारी सकाळी विस्कळीत झाली. त्यामुळं अनेक लोकल गाड्या डोंबिवली, कल्याण आणि टिटवाळा स्थानकात रद्द करण्यात आल्या आहेत. डोंबिवली आणि कल्याण ही मध्य रेल्वेची महत्वाची स्थानकं असल्यानं या स्थानकांवर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी जमली आहे. तसंच, ऐन गर्दीच्या वेळी गाड्या रद्द केल्यानं प्रवाशांना लेट मार्कच्या त्रासाला सामोरं जाव लागतं आहे.

मालगाडीच्या इंजिनात बिघाड 

खडवली- वाशिद स्थानकादरम्यान मालगाडीच्या इंजिनात बिघाड झाला आहे. त्यामुळं डाऊन मार्गावरील लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. तसंच बिघाड झालेल्या मालगाडीच्या मागे १ एक्सप्रेस उभी असून, या एक्सप्रेसमधील प्रवाशांना खोळंबा होत आहे. ठाकुर्ली स्थानकावर या संदर्भातली घोषणा करण्यात येते आहे.

लोकलमध्ये बिघाड

मध्य रेल्वेच्या कर्जत स्थानकातून निघालेल्या लोकलमध्ये नेरळ स्थानकात बिघाड झाल्याची माहिती समोर येत आहे. अचानक झालेल्या या बिघाडामुळं लोकलमधील प्रवाशांना नेरळ स्थानकात उतरण्यास सांगण्यात आलं आहे. तसंच, ही लोकल दुरूस्तीसाठी कारशेडमध्ये पाठविण्यात आली आहे. मात्र, अचानक बिघाड झाल्यानं नेरळ स्थानकातही प्रवाशांची मोठी गर्दी जमली आहे. त्याशिवाय, मध्य रेल्वेप्रमाणे हार्बर रेल्वेची वाहतुकही १० ते २० मिनिटं उशिरानं सुरू आहे.

दुरुस्तीचं काम हाती

दरम्यान, मध्य रेल्वे प्रशासनानं या सर्व बिघाडांची दखल घेतली असून, दुरुस्तीचं काम हाती घेतलं आहे. परंतु एकाच वेळी अनेक स्थानकात बिघाड झाल्यानं मध्य रेल्वेची बोंब सुरु असल्याच दिसून येतं आहे.हेही वाचा -

मध्य रेल्वेची कर्जत ते बदलापूर रेल्वे सेवा पुर्वपदावरसंबंधित विषय