निवासी डॉक्टरांची राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक

निवासी डॉक्टरांच्या समस्यांकडं राज्य शासनानं वारंवार दुर्लक्ष केल्यानं निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेनं राज्यव्यापी बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे.

निवासी डॉक्टरांची राज्यव्यापी बेमुदत संपाची हाक
SHARES

निवासी डॉक्टरांच्या समस्यांकडं राज्य शासनानं वारंवार दुर्लक्ष केल्यानं निवासी डॉक्टरांच्या मार्ड या संघटनेनं राज्यव्यापी बेमुदत संपाचा निर्णय घेतला आहे. बुधवार ७ ऑगस्टला रोजी हे निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत. तसंच, अनेकदा सेवा बंद ठेवूनही मार्ग न निघाल्यानं यावेळी डॉक्टरांनी आपत्कालीन वैद्यकीय सेवाही बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळं रुग्णांचे मोठ्या प्रमाणात हाल होण्याची शक्यता आहे.

समस्यांकडे दुर्लक्ष

अनेकदा पत्र व्यवहार करूनही राज्य शासन वारंवार डॉक्टरांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे.  अजून किती काळ केवळ आश्वासनांवर विश्वास ठेवायचा, असा प्रश्न या निवासी डॉक्टरांनी उपस्थित केला आहे. त्यामुळं आता शासनासमोर संपाचं हत्यार उगारण्याशिवाय पर्याय नाही. मागण्या मान्य होईपर्यंत राज्यातील निवासी डॉक्टर सेवेत हजेरी लावणार नसल्याचा इशारा या डॉक्टरांनी दिला आहे. 

आपत्कालीन सुविधा बंद

या संपामध्ये इतर सुविधांसह आपत्कालीन सुविधादेखील बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळं 'आता आमचा संयम न पाहता, राज्य शासनानं त्वरित मागण्या मान्य कराव्यात', असं आवाहन या डॉक्टरांनी केलं आहे. तसंच,नेकदा सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांत विद्यावेतन वेळेवर मिळत नाही. त्याचप्रमाणे, क्षयरोग झालेल्या निवासी डॉक्टरांना आणि महिला डॉक्टरांना प्रसूती रजा मिळण्यासाठी नियम असला पाहिजे, अशी मागणीही या डॉक्टरांनी केली आहे.हेही वाचा -

कांग्रेसचे नगरसेवक विठ्ठल लोकरे यांचा शिवसेनेत प्रवेश

मध्य रेल्वेची वाहतूक विविध कारणांमुळं विस्कळीत, प्रवाशांचे हालसंबंधित विषय