दादर पश्चिम-दादर पूर्वेला जोडणारा उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

दादर वाहतूक विभागाच्या हद्दीतील दादर पश्चिम आणि दादर पूर्व यांना जोडणारा एल्फिन्स्टन उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. वाहने पूर्णत: टिळक ब्रिज आणि करी रोड ब्रिजकडे वळवण्यात आली आहेत. त्यामुळे दादर वाहतूक विभागातील भवानी शंकर मार्ग व एस.के.बोले मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक सुरळीत ठेवण्याच्या उद्देशाने या रस्त्यांवरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत.

मुंबईतील वाहतूक बदल खालीलप्रमाणे

1) भवानी शंकर रोड एकेरी मार्ग (One Way) करण्यात आला आहे.

2) हनुमान मंदिराकडून गोपीटँककडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश निर्बंध.

पर्यायी मार्ग:  गोपीनाथ चव्हाण चौकातून हनुमान मंदिर व कबुतरखाना येथे येण्यासाठी गोपीनाथ चव्हाण चौकाकडून गोखले रोडने-झाकादेवी जंक्शन-पोर्तुगीज चर्च जंक्शन-उजवे वळण-पोर्तुगीज चर्च-हनुमान मंदिर-डावे वळण-पानेरी जंक्शन-कोतवाल गार्डनला वळसा घेऊन-पानेरी जंक्शन-हनुमान मंदिराकडून पुढे कबुतरखानाकडे जाता येईल.

गोपीटँक → कबुतरखाना → भवानी शंकर रोड → पेंढारकर चौक → जनकदेव रोड → भवानी मंदिर → नवेद वळण → भवानी शंकर रोड.

वाहतूक बदल – 2

एस. के. बोले रोडवर वाहतूक दिशाबदल लागू.

हनुमान मंदिराकडून पेंढारकर चौककडे जाणारी वाहतूक प्रभावित.

पर्यायी मार्ग:  हनुमान मंदिर येथून पोर्तुगीज चर्चकडे जाण्यासाठी हुनमान मंदिर-भवानी शंकर रोडने-कबुतरखाना-चितळे पथ क्रॉस-आगाशे पथ क्रॉस-बाबूराव परुळेकर मार्ग क्रॉस-गोपीनाथ चव्हाण चौकाला वळसा घालून पुढे गोखले रोडने-झाकादेवी जंक्शन-पोर्तुगीज चर्च जंक्शनकडे येता येईल.

हनुमान मंदिर → भवानी शंकर रोड → कबुतरखाना → टिळक पूल प्रवेश → आगाशे पथ → बाह्यवळण → गोपीटँक → भवानी शंकर रोड → पुढील मार्ग.


हेही वाचा

एअर इंडियानंतर इंडिगोच्याही देशांतर्गत विमान फेऱ्यांमध्ये घट

31 मेपासून मृणालताई गोरे उड्डाणपुलाचा विस्तार वाहतुकीसाठी खुला

पुढील बातमी
इतर बातम्या