परदेशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना क्वारंटाइनमध्ये सूट

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

परदेशातून मुंबई येणाऱ्या प्रवाशांना मोठी सुट देण्यात आली आहे. या प्रवाशांना आता संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये रहावं लागणार नाही. मात्र, या प्रवाशांना आपली कोविड टेस्ट झाल्याचं प्रमाणपत्र दाखवावं लागणार आहे. त्यांची कोविड टेस्ट झाली असेल तरच त्यांना  संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये राहण्यापासून सूट मिळणार आहे.

परदेशातून येणारे बहुतांश नागरीक हे तातडीच्या कामानिमित्त परत येत आहेत. त्यांना या नियमांमुळे मोठी अडचण येत होती. त्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. या आधी परदेशातून येणाऱ्या प्रवाशांना ७ दिवस संस्थात्मक आणि ७ दिवस घरातच क्वारंटाइन व्हाव लागत होतं. आता संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये सुट देण्यात आली आहे. मात्र घरात ७ दिवस क्वारंटाइन रहावं लागेल. या प्रवाशांना आपली कोविड टेस्ट झाली आहे याचं प्रमाणपत्र दाखवावं लगाणार आहे. ही टेस्ट ९६ तासांपूर्वी झालेली असावी अशी अट घालण्यात आली आहे.

राज्यात आज १० लाख २५ हजार ६६० व्यक्ती घरात क्वारंटाइनमध्ये आहेत. तर ३६ हजार ४५० संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत. राज्यात एकूण १ लाख ४९ हजार ७९८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.


हेही वाचा -

१५ ऑगस्टपासून पुढचे ५ दिवस पावसाचे, हवामान खात्याचा अलर्ट

ठाण्यातील सर्व दुकानं १५ ऑगस्टपासून सुरू होणार


पुढील बातमी
इतर बातम्या