Advertisement

ठाण्यातील सर्व दुकानं १५ ऑगस्टपासून सुरू होणार

ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली आहे. त्यामुळे ठाणे शहरात १५ ऑगस्टपासून सर्व दुकानं आठवड्यातून सातही दिवस खुली ठेवण्यास ठाणे महापालिकेने परवानगी दिली आहे.

ठाण्यातील सर्व दुकानं १५ ऑगस्टपासून सुरू होणार
SHARES

ठाण्यात कोरोना रुग्णांची संख्या घटू लागली आहे. त्यामुळे ठाणे शहरात १५ ऑगस्टपासून सर्व दुकानं आठवड्यातून सातही दिवस खुली ठेवण्यास ठाणे महापालिकेने परवानगी दिली आहे. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या अधिकारी आणि व्यापाऱ्यांच्या बैठकीत या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखली पार पडलेल्या या बैठकीला खासदार राजन विचारे, महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा आणि विविध व्यापारी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.


ठाणे शहरातील जी आस्थापनं P1 आणि P2 नुसार सुरु होती ती १५ ऑगस्टपासून राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सकाळी ९ ते रात्री ७ पर्यंत सुरु ठेवण्यात येतील. तसंच मॉल्स, मार्केट, जिम आणि स्वीमिंग पूलबाबत आढावा घेऊन त्यानंतर निर्णय घेण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनाला केल्या आहेत.


ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये जून महिन्यात लॉकडाऊन शिथिल केला होता. त्यानंतर येथील कोरोना रुग्णांची संख्या वाढली होती. त्यामुळे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी २ ते १९ जुलैपर्यंत लॉकडाऊन लागू केला होता. त्यानंतर सम-विषम पद्धतीने दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली होती.  सम-विषम नियमामुळे महिन्यातून पंधरा दिवस व्यापाऱ्यांना दुकाने बंद ठेवावी लागत आहेत. त्यामुळे व्यापारी वर्ग आर्थिक संकटात सापडला होता.


सध्या सण-उत्सवांचा काळ असल्यामुळे नागरिकांची दुकानांमध्ये खरेदीसाठी गर्दी होण्याची भीती आहे. त्यामुळे ही गर्दी टाळण्यासाठी आठवड्यातील सातही दिवस सर्वच दुकानं सुरं ठेवण्याची मागणी व्यापारी संघटनांनी केली होती. यासाठी संघटनेच्या शिष्टमंडळाने पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यासह आयुक्त आणि शहरातील सर्वच आमदारांची भेट घेतली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी या मागणीला मान्यता दिली.हेही वाचा

१५ ऑगस्टपासून पुढचे ५ दिवस पावसाचे, हवामान खात्याचा अलर्ट

१५ आॅगस्टला लोणावळ्याला जायचंय? पोलीस काय म्हणताहेत, वाचा…

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय