Advertisement

१५ आॅगस्टला लोणावळ्याला जायचंय? पोलीस काय म्हणताहेत, वाचा…

येत्या १५ आॅगस्ट रोजी लोणावळ्याला जाऊन पावसा-पाण्यात धम्माल मस्ती करण्याचा बेत आखत असाल, तर ही बातमी संपूर्ण वाचा.

१५ आॅगस्टला लोणावळ्याला जायचंय? पोलीस काय म्हणताहेत, वाचा…
SHARES

येत्या १५ आॅगस्ट रोजी लोणावळ्याला जाऊन पावसा-पाण्यात धम्माल मस्ती करण्याचा बेत आखत असाल, तर ही बातमी संपूर्ण वाचा. कारण मुंबई-पुण्याहून लोणावळ्याला येण्यास इच्छुक पर्यटकांसाठी पोलिसांनी खास सूचना जाहीर केल्या आहेत. (no entry in lonavala for monsoon picnic this year says police)

मागील २ आठवड्यापासून महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडत असून अत्यंत कमी वेळेत बॅकलाॅग भरून काढण्याचं काम यंदाचा मान्सून करत आहे. यामुळे लोणावळा परिसरातील नद्या-नाले, धरणं तुडूंब भरून वाहू लागले आहेत. जिकडे नजर टाकाल तिकडे सर्वत्र हिरवाई आणि जोडीला पांढरे शुभ्र फेसाळते झरे नजरेस पडत आहेत. त्यामुळे दरवर्षीप्रमाणे या वर्षीही हौशी पर्यटकांची पावलं निसर्गरम्य ठिकाणांकडे वळू लागली आहेत. कोरोना संकट असूनही काही हौशी पर्यटक आपल्या निवडक सहकाऱ्यांसोबत सह्याद्रीच्या कडा धुंडाळू लागले आहेत. 

हेही वाचा - Ganesh Festival 2020: कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या प्रवाशांना टोल माफ, सरकारचा मोठा निर्णय

राज्यात उद्योगधंदे सुरू झाल्याने नोकरदार वर्ग हळुहळू आपल्या नेहमीच्या जीवनशैलीत परतू लागले आहेत. त्यातच १५ आॅगस्ट रोजी येणारा शनिवार आणि त्याला जोडून रविवार येत असल्याने २ दिवस निसर्गाच्या सानिध्यात मौजमजा करण्याचे बेत आखले जात आहेत. पण हे बेत आखण्याआधी लोणावळा पोलिसांची सूचना नीट वाचा.  १५ ऑगस्ट रोजी कोणीही लोणावळ्यात येऊ नये असं आवाहन पोलिसांकडून करण्यात आलं आहे. पोलिसांची नजर चुकवून याठिकाणी कोणी आलेलं आढळल्यास त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांनी दिला आहे.

काही पर्यटक नियमांची पायमल्ली करत भुशी डॅम परिसरात दाखल झाले होते. अशा ३०० हून अधिक पर्यटकांवर लोणावळा पोलिसांनी खटले दाखल केले होते. या पर्यटकांना मावळ न्यायालयाने साडेतीन लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे.

पर्यटकांना रोखण्यासाठी पोलिसांनी खंडाळा, खालापूर टोल नाक्यासह नवसेना बाग, राईवूड चौकी याठिकाणी तपासणी नाके उभारले आहेत.

हेही वाचा - पावसाळी पर्यटनास ठाणे जिल्ह्यात बंदी, 'ही' आहेत बंदीची ठिकाणं


Read this story in English
संबंधित विषय