आता लसीकरण सर्टिफिकेटला पासपोर्ट करा लिंक, जाणून घ्या प्रक्रिया

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

केंद्र सरकारच्या कोविन वेब पोर्टलवर (Cowin) लसीकरण सर्टिफिकेटला (Vaccination certificate) पासपोर्ट लिंक (Passport) करण्याची सुविधा सुरू झाली आहे. याच्या माध्यमातून यूजर आपली वैयक्तिक माहितीमध्येही सुधारणा करू शकतील. आरोग्य सेतू अॅपच्या अधिकृत ट्विटर हँडलमध्ये याविषयी माहिती देण्यात आली आहे.

काय आहे प्रक्रिया?

  • सर्वात पहिले कोविनच्या अधिकृत पोर्टल www.cowin.gov.in वर जावे.
  • आपला मोबाइल नंबर टाकून लॉग-इन करा.
  • 'रेज इन इश्यू' पर्यायावर क्लिक करा.
  • यानंतर पासपोर्ट पर्यायावर क्लिक करा.
  • ज्या व्यक्तीच्या सर्टिफिकेटला तुम्हाला लिंक करायचे आहे त्याला ड्रॉप-डाउन मेन्यूतून निवडा.
  • आपला पासपोर्ट नंबर टाका आणि डीटेल भरुन सबमिट करा.
  • तुम्हाला काही सेकंदांमध्ये नवीन सर्टिफिकेट मिळेल.

सर्टिफिकेटची माहिती अपडेट करायची असेल, तर काय करावे?

जर तुमच्या लसीकरण सर्टिफिकेट आणि पासपोर्टची डीटेल मॅच करत नाही, तर तुम्ही लसीकरण सर्टिफिकेटमध्ये सुधारणा करू शकता.

  • www.cowin.gov.in वर जावे.
  • आपला मोबाइल नंबर टाकून लॉग-इन करा.
  • रेज इन इश्यू पर्यायावर क्लिक करा.
  • सर्टिफिकेटमध्ये सुधारणेसाठी दिलेल्या पर्यायावर क्लिक करा.
  • ज्या डीटेल्स तुम्हाला बदलायच्या आहेत, त्याला ड्रॉप-डाउन मेन्यूतून निवडा.
  • जी माहिती अपडेट करायची आहे, तो पर्याय निवडा.
  • तपशील दुरुस्त करा आणि नंतर सबमिट करा.

'या' गोष्टी लक्षात ठेवा

  • कोविन पोर्टलवर तुम्हाला तुमचे नाव आणि इतर तपशीलात सुधारणा करण्यासाठी केवळ एकच संधी मिळेल.
  • लसीकरण रजिस्ट्रेशन करत असताना तेच नाव टाका, जे तुमच्या पासपोर्टवर लिहिले आहे.
  • तुमचे पासपोर्ट आणि कोविन व्हॅक्सीनेशन सर्टिफिकेटमध्ये असलेल्या नावात फरक असू नये. अन्यथा पोर्टल हे घेणार नाही.


हेही वाचा

‘स्पुटनिक व्ही’ पुण्यात दाखल, 'या' तारखेपासून नागरिकांसाठी उपलब्ध

बेस्टच्या कामाची WHOकडून दखल, बाह्य तज्ज्ञ सल्लागार म्हणून आमंत्रित

पुढील बातमी
इतर बातम्या