Advertisement

‘स्पुटनिक व्ही’ पुण्यात दाखल, 'या' तारखेपासून नागरिकांसाठी उपलब्ध

रशियन बनावटीची ‘स्पुटनिक व्ही’ (Sputnik V) ही लस आता पुण्यात दाखल झाली आहे.

‘स्पुटनिक व्ही’ पुण्यात दाखल, 'या' तारखेपासून नागरिकांसाठी उपलब्ध
SHARES

रशियन बनावटीची ‘स्पुटनिक व्ही’ (Sputnik V) ही लस आता पुण्यात दाखल झाली आहे. पुणेकरांसाठी पहिल्या टप्प्यात साधारण ६०० डोस उपलब्ध झाले आहे. या लसीच्या एका डोसची खासगी रुग्णालयांमध्ये किंमत १ हजार १४२ रुपये एवढी असणार आहे.

पुणेकरांना स्पुटनिक व्ही लस २८ जूनपासून दिली जाणार आहे. या लसीच्या डोससाठी कोविन अ‍ॅप आणि पोर्टलवर नोंदणी करणं गरजेचं असणार आहे.

रशियामधील मॉस्कोतील गॅमालिया इन्स्टिट्युटद्वारे ही लस विकसित करण्यात आली आहे. हैदराबाद इथल्या डॉ. रेड्डीज लॅबोरेटरी यांच्याकडून स्पुटनिक व्ही लसीचे भारतातील वितरण सुरू आहे.

राज्यातील आणि पुण्यातील गॅलक्सी रुग्णालयात स्पुटनिक व्ही लसीचा पहिला डोस काही दिवसांपूर्वी डॉ. रेड्डीज लॅबोरेटरीजच्या ३६ वर्षीय व्यक्तीला देण्यात आला होता, अशी माहिती डॉ. शैलेश पुणतांबेकर यांनी दिली आहे.

कोव्हिशिल्ड, कोव्हॅक्सिनसह ‘स्पुटनिक व्ही’ या लसीच्या दोन डोसमधील अंतर निश्चित करण्यात आलं आहे. पहिला डोस घेतल्यानंतर स्पुटनिक व्ही लसीचा दुसरा डोस २१ दिवसानंतर घ्यायचा आहे. ही लस विकसित करण्यासाठी सर्दीच्या विषाणूचा उपयोग करण्यात आला आहे.

दरम्यान स्पुटनिक व्ही या लसीच्या वापरासाठी ५५ देशांमध्ये मान्यता मिळाली आहे. भारतासारख्या उष्ण तापमानाच्या देशात ही यशस्वी ठरु शकते, अशी शक्यता तज्ञांनी व्यक्त केली आहे.

तसंच या लसीमुळे नागरिकांना लसीकरणासाठी तिसरा पर्याय उपलब्ध झाला आहे. स्पुटनिक व्ही लसीमुळे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाची मोहीम गतिमान होण्यास मदत होणार आहे. स्पुटनिक व्ही लस कोरोनाविरुद्ध ९२ टक्के प्रभावी आहे.



हेही वाचा

मुंबईनंतर ठाण्यातही बोगस लसीकरण, गुन्हा दाखल

अव्वल! महाराष्ट्राने ओलांडला ३ कोटी लस मात्रांचा टप्पा

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा