Advertisement

अव्वल! महाराष्ट्राने ओलांडला ३ कोटी लस मात्रांचा टप्पा

कोरोना (coronavirus) प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ३ कोटींहून अधिक डोस देणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे.

अव्वल! महाराष्ट्राने ओलांडला ३ कोटी लस मात्रांचा टप्पा
SHARES

कोरोना (coronavirus) प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत ३ कोटींहून अधिक डोस देणारं महाराष्ट्र हे देशातील पहिलं राज्य ठरलं आहे. शुक्रवारी सायंकाळी सात वाजेपर्यंत सुमारे ४ लाख ८० हजार नागरिकांना लस देण्यात आली. 

शुक्रवारी दुपारी दोनच्या सुमारास ३ कोटी डोसेसचा टप्पा ओलांडून महाराष्ट्र (maharashtra) पुन्हा एकदा देशात अग्रेसर राहिलं आहे. लसीकरणात महाराष्ट्र पहिल्यापासून अग्रस्थानी आहे. आज झालेल्या लसीकरणामुळे सायंकाळी ७ पर्यंत ३ कोटी २ लाख ७१ हजार ६०६ लसीच्या मात्रा देण्यात आल्या आहेत. 

आज एकाच दिवसात ४ लाख ८० हजार ९५४ नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. सायंकाळी सातपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात वाढ होण्याची शक्यता असल्याचं आरोग्य विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितलं.

हेही वाचा- सलग दुसऱ्या दिवशी राज्यात लसीकरणाचा विक्रमी उच्चांक

मागील दोन दिवसांपासून राज्यात सर्वाधिक लोकांना लस मात्रा देण्याचा उच्चांक देखील नोंदवला जात आहे. 

मंगळवारी दिवसभरात ५ लाख ५२ हजार नागरिकांचं लसीकरण करण्यात आलं. यापूर्वी २६ एप्रिल रोजी एकाच दिवशी ५ लाख ३४ हजार नागरिकांना लस देण्यात आली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे बुधवारी राज्यात ६ लाख २ हजार १६३ नागरिकांना लस देण्यात आली.

पुणे शहर जिल्ह्यात दिवसभरात ६२३ केंद्रावर आतापर्यंतच्या लसीकरणामध्ये विक्रमी लसीकरण झाल्याची ‘को विन’ पोर्टलवर बुधवारी नोंद करण्यात आली होती. जिल्ह्यात सुमारे ९० हजार ५३० जणांचं लसीकरण करण्यात आलं. यापूर्वी ८५ हजारापर्यंत लसीकरण झाल्याची नोंद करण्यात आली होती. यामुळे आता एका दिवसात जिल्ह्यात १ लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण करणं शक्य असल्याचं सांगण्यात येत आहे.

(maharashtra crosses 3 crore covid 19 vaccine doses mark)

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा