Advertisement

सलग दुसऱ्या दिवशी राज्यात लसीकरणाचा विक्रमी उच्चांक

कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी उच्चांकाची नोंद करीत ६ लाख २ हजार १६३ नागरिकांना लस दिली.

सलग दुसऱ्या दिवशी राज्यात लसीकरणाचा विक्रमी उच्चांक
SHARES

कोरोना (coronavirus) प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेत महाराष्ट्राने (maharashtra) बुधवारी सलग दुसऱ्या दिवशी विक्रमी उच्चांकाची नोंद करीत ६ लाख २ हजार १६३ नागरिकांना लस दिली. एकाच दिवशी एवढ्या संख्येने लस देण्याची आतापर्यंतची ही सर्वात मोठी संख्या आहे. लसीकरणाची विक्रमी कामगिरी करणाऱ्या आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे कौतुक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

बुधवारी एकाच दिवशी ५ लाख ५२ हजार ९०९ जणांना लसीकरण करून आतापर्यंतचा उच्चांक नोंदविला होता. लसीकरणात सातत्य टिकवत महाराष्ट्र देशात अग्रस्थानी आहे. आतापर्यंत सुमारे २ कोटी ९१ लाखांहून अधिक लस मात्र राज्यात देण्यात आल्या आहेत. बुधवारी दिवसभरात ६ लाख २ हजार नागरिकांचे लसीकरण झाले. संध्याकाळी ७ वाजेपर्यंतची ही आकडेवारी असून त्यात अजून वाढ होऊ शकते.

पुणे शहर जिल्ह्यात दिवसभरात ६२३ केंद्रावर आतापर्यंतच्या लसीकरणामध्ये विक्रमी लसीकरण झाल्याची ‘को विन’ पोर्टलवर बुधवारी नोंद करण्यात आली आहे. जिल्ह्यात सुमारे ९० हजार ५३० जणांना लसीकरण झाले आहे. यापूर्वी ८५ हजारापर्यंत लसीकरण झाल्याची नोंद करण्यात आली होती. यामुळे आता दिवसात एक लाख लसीकरणाचा टप्पा पूर्ण करणे येत्या काही दिवसात शक्य असल्याचे सांगण्यात येत आहे.

दरम्यान, राज्यात गेल्या २४ तासात एकूण १० हजार ४७० नव्या करोना बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. तसेच आज नव्या रुग्णांपेक्षा बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. आज एकूण ११ हजार ०३२ इतके रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर, आज दिवसभरात १६३ करोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने ही माहिती दिली आहे.हेही वाचा -

Corona vaccine : २ वर्षांवरील मुलांचही होणार लसीकरण

  1. वन रुपी क्लिनिकचे संस्थापक राहुल घुलेंचा आत्महत्येचा प्रयत्न
Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा