Advertisement

Corona vaccine : २ वर्षांवरील मुलांचही होणार लसीकरण

तिसरी लाट ही अतितीव्र असून, यामध्ये लहान मुलांना अधिक संसर्ग होण्याची शक्यता व धोका वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका व राज्य सरकार सतर्क झाले असून, त्यांनी उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे.

Corona vaccine : २ वर्षांवरील मुलांचही होणार लसीकरण
SHARES

मुंबईसह राज्यभरात कोरोनाची (covid 19) आलेली दुसरी लाट आता ओसरू लागली आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण कमी होत आहे. त्यामुळं कडक निर्बंधांत शिथिलता आणली जात आहे. परंतु, दुसरी लाट ओसरली असली तरी आता तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात येत आहे. तिसरी लाट ही अतितीव्र असून, यामध्ये लहान मुलांना अधिक संसर्ग होण्याची शक्यता व धोका वर्तवण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर महापालिका व राज्य सरकार सतर्क झाले असून, त्यांनी उपाययोजना करण्यास सुरूवात केली आहे.

कोरोनाची तिसरी लाट प्रामुख्याने लहान मुलांसाठी धोकादायक असल्याचे सांगण्यात येत आहे. देशात लहान मुलांच्या लसीकरणासाठी मोठी यंत्रणा कामाला लागली आहे. जून महिन्यापासूनच लहान मुलांच्या लसीच्या चाचणीला सुरुवात झाली आहे. लहान मुलांच्या लसीकरणासंदर्भात एक आनंदाची बातमी समोर येत आहे. येत्या सप्टेंबरपर्यंत २ वर्षांवरील लहान मुलांना कोरोना लस उपलब्ध होणार असल्याचे दिल्लीच्या AIIMS रुग्णालयाचे प्रमुख डॉ. रणदीप गुलेरिया (AIIMS doctor randeep guleria) यांनी सांगितले आहे. २ वर्षावरील मुलांना भारत बायोटेक कंपनीची कोव्हॅक्सिन (covaxin) लस दिली जाणार आहे.

देशात कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सप्टेंबरपर्यंत पूर्ण होणार आहेत. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून लहान मुलांना देण्यात येणाऱ्या लसींची स्क्रिनिंग सुरु करण्यात आली आहे. सप्टेंबर पर्यत या चाचण्यांचा दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील डेटा उपलब्ध होणार आहे. त्यानंतर कोव्हॅक्सिन लस लहान मुलांना देण्याचा मार्ग मोकळा होईल. त्याचप्रमाणे याचदरम्यान जर फायझर बायोटेक (Pfizer-BioNTech) लसीला परवानगी मिळाली तर या लसी देखील लहान मुलांसाठी उपलब्ध होऊ शकतात, असं देखील डॉ. गुलेरिया यांनी म्हटले आहे.

देशात आता १७ वर्षांच्या मुलांवर कोरोना लसीची चाचणी सुरु आहे. याच दरम्यान आता कोरोना व्हायरसचा नवीन डेल्टा प्लस व्हेरिएंट (delta plus veriant) धुमाकूळ घालत आहे. कोरोनाच्या (coronavirus) या नव्या व्हेरिएंटमुळे पुढील काळात आळखी चिंता वाढणार असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं म्हटलं आहे. या व्हेरिएंटवर लस आणि नैसर्गिक अँटिबॉडीज देखील काम करत नसल्याचे वैज्ञानिकांचे म्हणणे आहे. देशात मंगळवारी डेल्टा प्लस व्हेरिएंटचे २२ रुग्ण समोर आले आहेत.

Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा