Advertisement

नालासोपारा–नायगाव स्टेशनचे हे FOB तात्पुरते बंद

प्रवाशांनी उपलब्ध पर्यायी जिन्यांचा वापर करून प्रवासाची योजना करावी, असे पश्चिम रेल्वेचे आवाहन.

नालासोपारा–नायगाव स्टेशनचे हे FOB तात्पुरते बंद
SHARES

पश्चिम रेल्वेने फूटओव्हर ब्रिज (FOB)च्या सुरू असलेल्या विस्तार आणि बांधकामामुळे नालासोपारा आणि नायगाव स्टेशनवरील काही FOB (foot over bridge) रविवारपासून तात्पुरते बंद राहणार असल्याची घोषणा गुरुवारी केली.

अधिकृत निवेदनानुसार, नालासोपारा स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वरचा FOB विस्ताराच्या कामासाठी रविवारपासून बंद राहतील. या काळात प्रवाशांनी उत्तरेकडील मुख्य जिन्याचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

याचप्रमाणे, नायगाव स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक 1 च्या दक्षिण FOB चा जिना देखील त्याच दिवशी सुरू असलेल्या विस्तार आणि बांधकामामुळे बंद राहील. प्रवाशांसाठी उत्तर बाजूचा पर्यायी जिना सुरू राहणार आहे.

पश्चिम रेल्वेने प्रवाशांना प्रवासाची योग्य योजना करण्याचे आवाहन केले असून, बांधकामाच्या काळात होणाऱ्या गैरसोयीबद्दल खेद व्यक्त केला आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा