वन रुपी क्लिनिकचे संस्थापक राहुल घुलेंचा आत्महत्येचा प्रयत्न

वन रूपी क्लिनिकचे संस्थापक डॉ. राहुल घुले ( Dr Rahul Ghule) यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

SHARES

वन रूपी क्लिनिकचे संस्थापक डॉ. राहुल घुले ( Dr Rahul Ghule) यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राहुल घुले यांनी ३० गोळ्या घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी खुद्द यासंदर्भात ट्विटरवर माहिती दिली होती. पण नंतर त्यांनी हे ट्विट डिलिट केलं.

पण त्यांनी डिलिट करण्याआधीच ट्विटचे स्क्रिनशॉट व्हायरल झाले. त्या ट्विटमध्ये म्हटलं आहे की, राजकीय दबावाखाली हा आत्महत्येचा प्रयत्न केला.


सध्या राहुल घुले यांना हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आलं आहे. मागील काही दिवसांपासून राहुल घुलेंनी ट्वीट करत राजकीय एजंट्सपासून आपल्या जिवाला धोका असल्याचं म्हटलं होतं. यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे देखील मदत मागितली होती.

काही दिवसांपूर्वी ट्वीटर वरून दूर जाण्याची वेळ आली आहे असे सूचक ट्वीट त्यांनी केलं होते. पण आता काल रात्री त्यांनी राजकीय दबावाचा दाखला देत आणि पैशांच्या व्यवहारात सामान्य व्यक्तीला होत असलेल्या त्रासातून आत्महत्येसारखी वेळ आली आहे असं सांगत टोकाचं पाऊल उचललं आहे.

कोरोना संकट काळामध्ये वन रूपी क्लिनिकनंही मोठे सहकार्य केले होते. नागरिकांसाठी कोविड केअर सेंटर उभं करून त्यांचे कोविड 19 चे उपचार तेथे सुरू होते. राहुल घुले हे वन रुपी क्लिनिकचे संस्थापक आहेत. अवघ्या एक रूपयाच्या फी मध्ये ते रूग्णांवर उपचार करत असल्यानं त्यांच्या या उपक्रमाचे मोठे कौतुक झाले होते. मध्य रेल्वेच्या ठाणे स्टेशन पासून त्यांनी या क्लिनिकची सुरूवात केली होती बघता बघता ही क्लिनिक आता अनेक स्टेशन नजिक उपलब्ध आहेत.



हेही वाचा

Coronavirus : कोरोनाची मोफत चाचणी करणार वन रुपी क्लिनिक

Coronavirus : कोरोनाची मोफत चाचणी करणार वन रुपी क्लिनिक

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा