Advertisement

Coronavirus : कोरोनाची मोफत चाचणी करणार वन रुपी क्लिनिक

जर कोणाला या संदर्भात कोणतीही चाचणी घ्यायची असेल तर ते जवळच्या स्टेशनवरील क्लिनिकमध्ये येऊन विनामूल्य तपासणी करू शकता.

Coronavirus : कोरोनाची मोफत चाचणी करणार वन रुपी क्लिनिक
SHARES

वन रुपी क्लिनिकचे प्रमुख डॉ. राहुल घुले म्हणाले की, आज नागरिक मोठ्या प्रमाणात कोरोनापासून घाबरत आहेत. नागरिक या परिस्थितीत संकोच करतात. जर कोणाला या संदर्भात कोणतीही चाचणी घ्यायची असेल तर ते जवळच्या स्टेशनवरील क्लिनिकमध्ये येऊन विनामूल्य तपासणी करू शकता. जर काही संशयास्पद असेल तर ते रुग्णाला कस्तुरबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करतील.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी वन रुपीसारख्या क्लिनिक उपक्रमाचं स्वागत केलं आहे.

सध्या कुर्ला, चेंबूर, मानखुर्द, पनवेल, भांडुप, ठाणे, कळवा, मुंब्रा, डोंबिवली, टिटवाला, उल्हासनगर, अंबरनाथ, मुंबई सेंट्रल, नायगाव, ग्रांट रोड, नालासोपारा, विरार आणि पालघर इथं वन रुपी क्लिनिक कार्यरत आहेत.


All Station Name

KURLA
CHEMBUR
MANKHURD
PANVEL
BHANDUP
THANE
KALVA
MUMBRA
DOMBIVALI
TITWALA
ULHASNAGAR
AMBERNATH
MUMBRA
MUMBAI CENTRAL
GRANT ROAD
NAIGAON
NALASOPARA
VIRAR
PALGHAR

दरम्यान देशातील कोरोनाच्या आकड्यात प्रचंड वाढ झाली आहे. भारतामध्ये ४०० हून अधिक पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सरकारच्या चिंतेत वाढ झाली आहे. महाराष्ट्रात हा आकडा ८९च्या घरात आहे. यापैकी ३ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्रात १४४ लागू करण्यात आली आहे. नागरिकांना घरात राहण्याचा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. पण उद्धव ठाकरेंच्या आहवानाला नागरिकांनी केराची टोपली दाखवत सोमवारी खाजगी वाहतुकितून प्रवास केला.




Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा