चित्रपट, टीव्ही इंडस्ट्रीतील कामगारांचं बेमुदत उपोषण; शूटिंगवर परिणाम

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

आपल्या विविध मागण्यांसाठी चित्रपट, टीव्ही मालिकेतील कामगार, महिला कलाकार आणि टेक्निशिअन मागील 5 दिवसांपासून बेमुदत उपोषणाला बसले आहेत. या कामगारांनी शुक्रवारी आपले उपोषण आणखी तीव्र केले. या उपोषणात विविध संघटनेतील 16 पदाधिकाऱ्यांचाही समावेश आहे. जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचा इशारा या कामगारांनी दिला आहे.

अडीच लाख कर्मचारी उपोषणावर

चित्रपट आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करणारे जवळपास 2.50 लाख कर्मचारी उपोषणाला बसले आहेत. शुक्रवारी उपोषणाचा चौथा दिवस होता. या उपोषणात फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईज (FWICE) या संघटनेसह आणखी 22 संघटनांचा समावेश आहे. कामगारांच्या उपोषणामुळे अनेक चित्रपट आणि मालिकांच्या शूटिंगवरही परिणाम होताना दिसत आहे.

काय आहेत मागण्या?

  • साफ-सफाई आणि सुरक्षा
  • आठ तासांची शिफ्ट
  • जास्त वेळ काम केल्यास डबल पेमेंट
  • सर्व विभागातील कामगार, तंत्रज्ञ आणि कलाकारांना तात्काळ वेतनवृद्धी
  • मासिक आणि दैनंदिन स्वरुपात वेतन मिळण्याऱ्या सर्वांचा समावेश
  • अॅग्रिमेंटशिवाय कामावर ठेवू नये
  • किमान दर करार मानले जाणार नाहीत
  • नोकरीची सुरक्षा
  • उत्तम आहार आणि शासनमान्य सुविधा


हेही वाचा  

म्हाडावासीयांचं बेमुदत उपोषण

पुढील बातमी
इतर बातम्या