Budget 2022 : काय स्वस्त? काय महाग? जाणून घ्या

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महागाईनं होरपळलेल्या नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्नही या अर्थसंकल्पा (Budget 2022) तून करण्यात आला आहे. मोबाईल फोन, चार्जर, कॅमेरा लेन्स आदी इलेक्ट्रीक वस्तूंसह कपडे आणि चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार आहेत. त्यामुळे सर्व सामान्यांना दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आज अर्थमंत्री म्हणून चौथा अर्थसंकल्प सादर केला. यावेळी त्यांनी काही वस्तू स्वस्त करून मोठा दिलासा दिला आहे.

मोबाईल फोन चार्जरचा ट्रान्सफार्मर आणि कॅमेरा लेन्सवरील आयात शुल्क घटवण्यात आलं आहे. त्यामुळे मोबाईल फोन चार्जर स्वस्त होणार आहेत. तसेच देशात निर्माण होणारे मोबाईलही स्वस्त होणार आहेत. देशांतर्गत मोबाईल निर्मिताला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या शिवाय अर्थमंत्री सीतारामण यांनी काही केमिकल्सवरील कस्टम ड्युटी घटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात मिथेनॉलचा समावेश आहे. देशांतर्गत मॅन्यूफॅक्चरिंगला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. स्टि

ल स्क्रॅपवरील कस्टम ड्युटीवरही सूट एक वर्षाने वाढवण्यात आली आहे.

तसंच जेम्स अँड ज्वेलरीवरील कस्टम ड्युटी ५ टक्क्यांनी घटवण्यात आली आहे. त्यामुळे जेम्स अँड ज्वेलरी स्वस्तात मिळणार आहेत.

काय स्वस्त होणार

  • चामडे
  • बूट
  • चपला
  • विदेशी सामान
  • कपडे
  • शेतीशी संबंधित वस्तू
  • पॅकेजिंग डब्बे
  • पॉलिश केलेले डायमंड
  • मोबाईल फोन
  • मोबाईल चार्जर
  • जेम्स अँड ज्वेलरी
  • LPG सिलिंडर
  • कॅमेरा लेन्स

काय महागणार

  • कॅपिटल्स गुड्सवर आयात शुल्कावरील सूट रद्द करण्यात आली आहे. आता कॅपिटल्स गुड्सवर ७.५ टक्के आयात शुल्क आकारण्यात येणार आहे.
  • आयात होणारे इमिटेशन ज्वेलरी
  • परदेशी छत्रीही महागणार
  • सार्वजनिक वाहतुकीत ईव्ही कार, बाईक, स्कूटर स्वस्त मिळणार नाहीत


हेही वाचा

Budget 2022 : कर रचनेसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा, जाणून घ्या अर्थमंत्री काय म्हणाल्या?

पुढील बातमी
इतर बातम्या