लोअर परळमधील रघुवंशी मिलमध्ये भीषण आग

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईत आणखी एक आगीची घटना घडली आहे. लोअर परेलमधील रघुवंशी मिलमध्ये मोठी आग लागली आहे.  आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. लेव्हल ३ ची ही आग असूून विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

 रघुवंशी मिलमधील पी टू या इमारतीला भीषण आग लागली आहे. इमारतीचा पहिला मजल्यावर आग वेगाने पसरली.  खाजगी कार्यालय बंद असल्याने सुदैवाने कुणीही यात जखमी झालेलं नाही. जवळच्या इमारतीमध्ये काही कार्यालयात काम करत असलेल्या सर्वांना बाहेर काढण्यात आलं आहे.

गुरूवारी मुंबईत आग लागण्याची ही तिसरी घटना आहे. गुरुवारी पहाटेच्या सुमारास नरीमन पॉइंट येथील जॉली मेकर इमारतीतील बँक ऑफ बहरेन आणि कुवैतच्या शाखेत भीषण आग लागली. अंधेरीच्या मरोळ भागातील नंद-धाम औद्योगिक वसाहतीमध्ये  गुरूवारी  १२. ५० वाजताच्या सुमारास आग लागली. यात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. आग विझवताना बेशुद्ध झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानाला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 


हेही वाचा -

मुंबईत 'या' बँकेच्या कार्यालयात मोठी आग


पुढील बातमी
इतर बातम्या