Advertisement

मुंबईत 'या' बँकेच्या कार्यालयात मोठी आग


मुंबईत 'या' बँकेच्या कार्यालयात मोठी आग
SHARES

मुंबईतील अनेक भागांत मागील काही दिवसांपासून आग लागणं व इमारतीचा भाग कोरळण्याच्या घटना घडत आहेत. अशीच घटना गुरूवारी सकाळी दक्षिण मुंबईच्या नरीमन पॉइंट परिसरात घडली आहे. नरीमन पॉइंट येथील जॉली मेकर इमारतीतील बॅंक ऑफ बहरीन अॅण्ड कुव्येत ब्रॅंच या बँकेच्या कार्यालयात आग लागली. गुरूवारी सकाळी पहाटेच्या सुमारास ही आग लागली होती.

या आगीची माहिती मिळताच घटनास्थळी अग्नीशमन दलाच्या जवानांनी धाव घेत आग आटोक्यात आणली. ही आग कशामुळं लागली याचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. या प्रकरणी पोलीस, अग्नीशमन दलाचे जवान व बॅंकेचे कर्मचारी तपास करत आहेत. या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, बँकेतील कागदपत्रांचं मोठं नुकसान झालं आहे.

काही दिवसांपूर्वी मुंबईत पडत असलेल्या पावसात कुर्ल्याच्या एल वार्डातील निता इमारतीचा कोपरा ढासळल्याची घटना घडली होती. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतिही जिवीत हानी झाली नाही. घटनास्थळी अग्निशमन दलाचे जवान दाखल होऊन त्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. कित्येक वर्ष जुनी झालेल्या या इमारतीचे बांधकाम जीर्ण झाले होते. या इमारतीत काही कुटुंबिय वास्तव्यास होते.



हेही वाचा -

Actor Govinda's Car Accident अभिनेता गोविंदाच्या कारचा अपघात

Containment Zones List In Mumbai: मुंबईतील कंटेन्मेंट झोनची संख्या ७६५ वर, 'ही' आहे यादी



Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा