Actor Govinda's car accident अभिनेता गोविंदाच्या कारचा अपघात

जुहू परिसरातील एका सिग्नलवर उभी असताना. मागून दुसऱ्या गाडीने धडक दिली.

Actor Govinda's car accident अभिनेता गोविंदाच्या कारचा अपघात
SHARES
प्रसिद्ध अभिनेता गोविंदाच्या कारचा बुधवारी राञी जुहू परिसरात अपघात झाला. गोविंदाच्या गाडीला दुसऱ्या गाडीने धडक दिली. सुदैवानॆ या अपघातात कुणी ही जखमी झालेले नाही. माञ दोघांनी प्रकरण पोलिसांपर्यत न नेता, आपापसात मिटवून घेतल्याचे कळते.

सूञांनी दिलेल्या माहितीनुसार गोविंदाची गाडी राञी 8 च्या सुमारास जुहू परिसरातील एका सिग्नलवर उभी असताना. मागून दुसऱ्या गाडीने धडक दिली. या अपघातात गाडीचे थोडे नुकसान झाले. माञ त्यावेळी गाडीत गोविंदा नव्हता, तर त्याचा मुलगा यशवर्धन होता. ड्रायव्हर गाडी तालवत असल्याने यशवर्धन त्याच्या शेजारी बसला होता. अपघाताचे वृत्त कळताच काही वेळाने गोविंदा घटनास्थळी आला. त्यावेळी त्याने त्याच्या मोबाइलमध्ये अपघात पाहणाऱ्या प्रत्यक्षदर्शी व्यक्तीचा आणि मुलाचा व्हिडिओ ही रेकाँर्ड केला. त्यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. ज्यामुळे रस्त्यावरील वाहतूकीला ही अडथळा होत होता. 

त्यानंतर गोविंदाने पुढे प्रकरण न वाढवता मुलाला घेऊन तेथून निघून गेला. सुदैवाने या अपघातात कुणी ही जखमी झालेले नसून दोघांनी प्रकरण पुढे न वाढवता आपापसात मिठवले. या प्रकरणी अदयाप कोणतिही तक्रार नोंदवण्यासाठी आलेलं नसल्याचे जुहू पोलिसांकडून सांगण्यात आले.




Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा