अंधेरीच्या चित्रकूट सेटला भीषण आग, अग्निशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

मुंबईतील अंधेरीमधून (Andheri) आगीचं वृत्त समोर आलं आहे. अंधेरीमधील एका इमारतीला आग (Fire) लागली आहे. या आगीमुळे हवेत आगीच्या धुराचे लोळ पसरले आहेत. या घटनेनंतर अग्नीशमन दलाच्या 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. तसेच दोन पाण्याचे टँकर देखील घटनास्थळी आहेत.

आग लागल्यामुळे संपूर्ण परिसर धुराने व्यापला असून सध्या त्या सेटवर किती लोक अडकले आहेत, किती जणांची सुटका करण्यात आली आहे, ही माहिती समोर आलेली नाही. मात्र आगीवर लवकरात लवकर नियंत्रण मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. फिल्म शूटिंगच्या स्टुडिओ असल्यामुळे आग वेगाने पसरली. या आगीमध्ये संपूर्ण फिल्म शूटिंगचे स्टुडिओ जळून खाक झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, चित्रकुट मैदानावर रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूरच्या आगामी चित्रपट 'लव रंजन'चा सेट उभारण्यात आला होता. सेट वर लाईटिंगचे काम सुरू होते त्यावेळी आग लागली आहे. पुढील आठवड्यापासून चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात होणार होती.

शेजारी राजश्री फिल्मचे दोन सेट होते. त्याला आग लागलेली नाही. चित्रपटाचे नाव निश्चित नसून काही दिवसापूर्वी त्याचे शुटिंग पॅरिसला झाले. सेटचे काम सुरू असल्याने मोठ्या संख्या मध्ये कामगार आगीमध्ये अडकल्याचा अंदाज आहे.

अंधेरीतील या आगीचे व्हिडीओ समोर आले आहेत. तसेच सदर व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. या व्हिडीओमध्ये या इमारतीच्या आजूबाजूला काळ्या रंगाचे धुराचे लोट पाहायला मिळत आहे. त्यामुळे धूर संपूर्ण परिसरात पसरत आहे. या इमारतीत किती जण अडकले, याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

याआधी देखील मुंबईत आगीच्या दुर्घटना घडल्या आहेत. मुंबईतील वेगवेगळ्या आगीच्या घटनेत अनेकांना जीव गमवावे लागले आहेत. सर्वात मोठी आग ही जानेवारी महिन्यात कमला इमारतीला लागली होती. भाटीया रुग्णालयाजवळील कमला इमारतीच्या २० व्या मजल्यावर ही आग लागली होती. या आगीत २८ जण जखमी झाले होते. तर ६ लोकांचा मृत्यू झाला होता.


हेही वाचा

भारतात बॅटलग्राऊंड गेमवर बंदी का? या कारणाची होतेय चर्चा

विरार ते मीरा रोड मार्गावर मेट्रोची गरज, राजेंद्र गावितांची लोकसभेत मागणी

पुढील बातमी
इतर बातम्या