Advertisement

भारतात बॅटलग्राऊंड गेमवर बंदी का? या कारणाची होतेय चर्चा

Battlegrounds Mobile India (BGMI) - Crafton चा लोकप्रिय गेम, ज्याने अलीकडेच भारतात 100 दशलक्ष वापरकर्ते ओलांडले आहेत, Google Play Store आणि Apple App Store वरून हटवला गेला आहे.

भारतात बॅटलग्राऊंड गेमवर बंदी का? या कारणाची होतेय चर्चा
SHARES

मोठ्या प्रमाणात मोबाईलवर खेळला जाणाऱ्या 'बॅटलग्राऊंड' या गेमवर भारतात बंदी आली आहे. कुठलीही अधिकृत सुचना न देता हा गेम गुगल प्ले स्टोअरवरून हटवण्यात आला आहे. आता यापुढे हा गेम अॅप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करता येणार नाही.

'बॅटल ग्राऊंड' हा कुप्रसिद्ध गेम २०२१ मध्ये भारतात लाँच झाला होता. आधीच बॅन झालेल्या पबजी गेमच्या जागी बॅटल ग्राऊंड लाँच करण्यात आला होता. गेमचा संबंध चीनशी जोडत भारताच्या सुरक्षेला धोका असल्याचं कारण देत पबजीवर (PUBG) भारतात बंदी घालण्यात आली होती.

दुसरा कुप्रसिद्ध गेम सांगायचं झाल्यास 'गरेना फ्री फायर'(Garena Free Fire). या गेमवरसुद्धा याच कारणाने बंदी घालण्यात आली होती. पबजी गेम भारतात बॅन झाल्यानंतर गेम खेळणाऱ्यांकडून सतत केलेल्या हट्टानंतर 'बॅटल ग्राऊंड' गेम भारतात लाँच करण्यात आला होता.

बॅटल ग्राऊंड मुळात पबजी गेमची कॉपी असला तरी हा गेम साऊथ कोरीयाच्या क्रॅफ्टॉन (Krafton) कंपनीकडून तयार करण्यात आलाय.

गेम अॅप तयार करणाऱ्या कंपनीने याबाबत एक स्पष्टीकरण जारी करत म्हटले आहे की, 'आम्हाला अधिकृत माहिती मिळताच हा गेम गुगल प्ले स्टोअरवरून का हटवण्यात आला याबाबतची माहिती आम्ही कळवू.'

टेक क्रंचच्या मनीष सिंग यांनी देखील त्यांच्या ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली आहे. शासनाच्या आदेशानुसार गेमवर बंदी घालण्यात आल्याचे त्यांनी ट्विट करत सांगितले आहे.

BGMI या कुप्रसिद्ध गेमच्या आहारी गेलेल्या १६ वर्षीय मुलानं गेमवरून झालेल्या वादानंतर आपल्या आईला जीवाने मारले.अलीकडील अहवालानुसार, PUBG सारख्या ऑनलाइन गेमच्या वादातून एका 16 वर्षीय मुलाने आपल्या आईला गोळ्या घालून ठार मारले. भारतीय कायदा अंमलबजावणी या घटनेचा तपास करत आहे.Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा