पालिकेच्या खुल्या नाट्यगृहांमध्ये पहिल्यांदाच संगीत सभांचे आयोजन

  • मुंबई लाइव्ह टीम
  • सिविक

महापालिकेच्या १६ उद्यानांमधील खुल्या नाट्यगृहांमध्ये पहिल्यांदाच संगीत सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. येत्या शनिवारी १९ जानेवारी रोजी 'मुंबई ग्रीन रागा' या शीर्षकांतर्गत संगीत सभांचं आयोजन करण्यात आलं आहे. शनिवारी सकाळी ७ वाजता संगीत सभा सुरू होणार असून, यामध्ये ७५ पेक्षा अधिक उदयोन्मुख संगीत साधक आपली कला सादर करणार आहेत. या संगीत सभांमध्ये गायनासह सारंगी, बासरी, तबला, संवदिनी, सितार, सरोद, संतूर, यांसारख्या विविध वाद्यवादन केलं जाणार आहे. हा कर्यक्रम नि:शुक्ल असणार आहे.

संगीत सभांचं आयोजन

मुंबई महापालिकेच्या २८ उद्यानांमध्ये खुली वर्तुळाकार नाट्यगृहं आहेत. या नाट्यगृहांपैकी १६ उद्यानांमध्ये शनिवारी संगीत सभांचं आयोजन करण्यात येणार आहे. 'टेंडर रुट्स अकादमी ऑफ परफॉर्मिंग आर्टस' आणि 'बनयान ट्री' या संस्थांच्या अंतर्गत या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत असल्याची माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

कलाकारांना आपल्या कला सहजपणे सादर करता याव्यात, यासाठी काही उद्यानांमध्ये वर्तुळाकार आणि अर्धवर्तुळाकार मंच उपलब्ध करण्यात आले आहेत. त्याचप्रमाणं, याठिकाणी नाट्यप्रेमी रसिकांना बसण्यासाठी वैशिष्यपूर्ण आसनांची व्यवस्थासुद्धा करण्यात आली आहे.


हेही वाचा -

महापौर निघाले राणीच्या बागेत, महापौर निवासातून सामान हलवण्यास सुरूवात

संपावरून राजकारण सुसाट! शिवसेनेला बदनाम करण्यासाठी संप लांबवला-अॅड. अनिल परब


पुढील बातमी
इतर बातम्या